एमडी तस्कराला मुंब्रा येथून अटक : तीन लाखांची एमडी पावडर हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 05:41 PM2020-11-24T17:41:46+5:302020-11-24T17:44:41+5:30

मुंब्रा बायपास रोड येथे मेफेड्रॉन (एमडी) पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या अर्शदअली रमजानअली शहा (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाखांच्या एमडी पावडरसह इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण तीन लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

MD smuggler arrested from Mumbra: Worth of 3 lakh MD powder seized | एमडी तस्कराला मुंब्रा येथून अटक : तीन लाखांची एमडी पावडर हस्तगत

मुंब्रा बायपास रोडवर सापळा लावून घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईमुंब्रा बायपास रोडवर सापळा लावून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंब्रा बायपास रोड येथे मेफेड्रॉन (एमडी) पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या अर्शदअली रमजानअली शहा (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तीन लाखांची दोनशे ग्रॅम एमडी पावडर हस्तगत केली आहे.
मुंब्रा बायपास रोडवरील रशीद कंपाऊंड येथे एक व्यक्ती एमडी पावडरच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, संदीप चव्हाण, प्रफुल्ल जाधव, हवालदार आबुतालीब शेख आणि सुभाष मोरे आदींच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बायपास ढाब्याच्या समोर अर्शदअली याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्याकडून तीन लाखांच्या एमडी पावडरसह इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण तीन लाख पाच हजार रु पये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: MD smuggler arrested from Mumbra: Worth of 3 lakh MD powder seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.