ठामपाची ‘अशी ही बनवाबनवी’; स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 02:01 AM2020-01-31T02:01:53+5:302020-01-31T02:02:03+5:30

शहरात निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाने सुरुवातीला आॅक्टोबर २०१९ पर्यंतची मुदत दिली होती.

'Make It Like This'; Center fraud for clean survey | ठामपाची ‘अशी ही बनवाबनवी’; स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राची फसवणूक

ठामपाची ‘अशी ही बनवाबनवी’; स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राची फसवणूक

Next

- अजित मांडके

ठाणे : शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्याचे दोन प्रकल्प सध्या मुंब्य्रात महापालिकेने कार्यान्वित केले आहेत. हे दोन्ही प्रकल्प दोन वर्षांपासून सुरू असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. प्रत्यक्षात मात्र मागील एक ते दीड महिन्यांपासूनच ते कार्यान्वित केले असल्याची धक्कादायक बाब लोकमतच्या पाहणीत उघड झाली. केवळ न्यायालयाने घातलेली बांधकामबंदी उठविण्यासाठी आणि स्वच्छ सर्वेक्षणात घसरलेला क्रमांक सुधारावा, यासाठीच पालिकेने बनवाबनवी करून केंद्र शासनाच्या डोळ्यांत धूळफेक केल्याची बाब या पाहणीत समोर आली.

शहरात निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाने सुरुवातीला आॅक्टोबर २०१९ पर्यंतची मुदत दिली होती. त्यात पुन्हा दोन महिन्यांची वाढ केली होती. परंतु, त्यानंतरही महापालिकेला न्यायालयात आपली बाजू मांडण्यात अपयश आले. असे असताना आता महापालिकेच्या माध्यमातून शहरात निर्माण होणाºया ९२३ मेट्रिक टन कचरा विल्हेवाटीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत, याचे शपथपत्र सादर केले जाणार आहे.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जुना आणि नवीन निर्माण होणारा कचरा याचा कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यानुसार जुन्या कचºयाच्या विल्हेवाटीचा प्रस्ताव डिसेंबरमध्ये झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे. तसेच शहरातील कचºयाची विकेंद्रित आणि केंद्रित पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. डायघर येथील प्रकल्प या नव्या वर्षात सुरू होईल, अशी आशा प्रशासनाला आहे.

याठिकाणी कचºयापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. विकेंद्रित पद्धतीनुसार हिरानंदांनी इस्टेट येथे ३५ मेट्रिक टन, वृंदावन येथे १० मेट्रिक टन आणि कोलशेत येथे ३५ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. अशा रीतीने केंद्रित, विकेंद्रित पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरूआहेत. सुक्या कचºयाची विल्हेवाट लावण्याचे कामही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु, या सर्वांना बराच कालावधी लागणार आहे. ते काम एका दिवसात होणारे नाही, अशा आशयाचे शपथपत्र तयार केले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यासाठीच हा अट्टहास केल्याचे आता उघड झाले आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाची बाजू जाणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

ओल्या कचºयाविषयी महापालिकाच साशंक
महापालिका हद्दीत नेमका किती ओला कचरा निर्माण होतो, याबाबत पालिकाच साशंक असल्याचे दिसून आले. शहरात तयार होणाºया कचºयाचे वर्गीकरण करून तो सीपी तलावाच्या ठिकाणी आणला जातो. मात्र, तेथून तो एकत्र करूनच पुढे डम्पिंगवर टाकला जात आहे. त्यामुळे यातून किती ओल्या कचºयावर मुंब्य्रातील या प्लान्टच्या ठिकाणी प्रक्रिया होते, याबाबतही आता शंका निर्माण झाली आहे.

बायोगॅस प्रकल्पाची जागा बदलली
दिव्यासाठीचा जो प्रकल्प पालिकेने तयार केला आहे, त्याच जागेवर आधी पाच मेट्रिक टनाचे बायोगॅस प्रकल्प उभे राहणार होते. मात्र, आता त्यांची जागा बदलण्यात आली असल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे.

सोसायट्यांना सक्ती का? : प्रत्यक्षात कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प न उभारता केवळ स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत घसरगुंडी उडाल्याने आपली इभ्रत वाचविण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा आभास निर्माण करणाºया प्रशासनाला सोसायट्यांना कचरा विल्हेवाटीची सक्ती करण्याच्या अधिकार आहे का, असा प्रश्न आता यानिमित्ताने ठाणेकरांकडून करण्यात येत आहे.

महापौरांच्या पत्राला केराची टोपली
शहरातील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा विभागाचे किती ठिकाणी कोणते प्रकल्प सुरू आहेत, याची माहिती डिसेंबर २०१९ मध्ये महापौरांनी पत्र देऊन घनकचरा उपायुक्तांकडे मागितली होती. मात्र, ही माहिती अद्याप प्रशासनाने महापौरांना दिलेली नाही. महापौरांनाच माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाचे नक्की चाललंय तरी काय, असा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

खतनिर्मिती प्रकल्प कागदावरच
ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचे दोन प्रकल्प सध्या मुंब्य्रातील मित्तल कम्पाउंड परिसरात कार्यान्वित केले आहेत. त्यानुसार एका बाजूला दिव्यासाठी ७५ मेट्रिक टनचा प्रकल्प आणि दुसºया बाजूला डम्पिंगकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला मुंब्य्रासाठी ५० मेट्रिक टनांचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. हे दोन्ही प्रकल्प मागील दोन वर्षांपासून कार्यान्वित केल्याचा दावा केला. या प्रकल्पातून खतनिर्मिती केली जात असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, आतापर्यंत या प्रकल्पातून किती खतनिर्मिती झालीद्व याचे उत्तर पालिकेकडे नाही.

महापालिकेने असा केला आहे बनाव
महापालिकेने केलेला हा दावा किती खरा आहे, हे पाहण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, पालिकेचा हा दावा फोल असल्याचे उघड झाले. मागील दोन वर्षांपासून नाही तर एक ते दीड महिन्यांपूर्वी दिव्यातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जात आहे, त्याठिकाणी सुमारे २०० ट्रक मातीचा भराव टाकून त्यावर ओला कचरा टाकला आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा दावा हा रोज ७५ मेट्रिक टन कचरा टाकला जात असल्याचा आहे. तसे असेल तर याठिकाणी कचºयाचे मोठमोठे ढिगारे तयार होणे अपेक्षित आहे. तसेच या कचºयाचे खतामध्ये रूपांतर होण्यासाठी कमीतकमी २० ते २५ दिवसांचा कालावधी जातो. परंतु, यावरही महापालिकेने गमतीशीर तोडगा काढला आहे. वरील बाजूस अक्षरश: पालिकेने भुसा टाकला आहे. दुसरीकडे मुंब्य्रासाठीचा ५० मेट्रिक टनाचादेखील प्रकल्प कार्यान्वित केला आहे. परंतु, हा प्रकल्प डम्पिंगला जाण्याच्या रस्त्यावरच असल्याचे दिसत आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या ठिकाणी एक लोखंडी केबिन, ग्रीन नेट उभारले आहे. यामध्ये कामगारांसाठी विश्रांती कक्षही उभारला आहे. परंतु, त्याची अवस्था दयनीय आहे. दोन्ही ठिकाणी ४०-४० चे मनुष्यबळ कार्यान्वित असल्याचा फलकही लावला आहे. त्यांच्यासाठी शौचालय असल्याचा फलकही त्याठिकाणी लावला आहे. मात्र, प्रत्यक्षात शौचालयच नसल्याचे दिसत आहे. तर, पिण्याच्या पाण्याचे पिंप ठेवले असून त्यातील एक खाली पडले आहे. दुसºया ठिकाणच्या पिंपातील पाण्यात अळ्या तयार झाल्या आहेत. या प्रकल्पांच्या ठिकाणी व्हर्मिकम्पोस्टिंग, विण्डो प्रकल्प कार्यान्वित असल्याचा फलक आहे.

Web Title: 'Make It Like This'; Center fraud for clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.