नेरळमध्ये महायुतीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:24 AM2019-09-04T00:24:15+5:302019-09-04T00:24:36+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदासह ११ महायुती, पाच महाआघाडी,एक अपक्ष सदस्य विजयी

Mahayuti's bet in Neral grampanchayat election | नेरळमध्ये महायुतीची बाजी

नेरळमध्ये महायुतीची बाजी

googlenewsNext

नेरळ / कर्जत : रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ३१ आॅगस्ट रोजी पार पडली होती. चुरशीच्या या निवडणुकीत ७२ टक्के मतदान झाले होते. मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. यात महायुतीचा थेट सरपंच विजय झाला असून, थेट सरपंचपदासह ११ महायुतीचे, महाआघाडी पाच तर अपक्ष एक सदस्य विजयी झाले.

मंगळवारी कर्जत तहसील कार्यालय येथे मतमोजणी झाली. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजप-आरपीआय अशी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-मनसे-आरपीआय अशी महाघाडीत चुरशीची लढत झाली. सहा प्रभागामधील चार, पाच आणि सहा प्रभागांत अटीतटीची लढत झाली. थेट सरपंचपदासह सहा प्रभागांतील १७ जागांसाठी ही लढत झाली. सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी एकूण ४३ उमेदवार रिंगणात होते. थेट सरपंचपदासाठी चार जणांमध्ये लढत झाली. महायुतीकडून रावजी शिंगवा, महाआघाडीकडून धाऊ उघडे, अपक्ष प्रवीण ब्रम्हांडे आणि कविता शिंगवा असे चार उमेदवार निवडणूक लढवत होते. यात महायुतीच्या थेट सरपंचपदाचे उमेदवार रावजी शिंगवा २११ मतांनी विजयी झाले. तर महायुतीचे ११ सदस्य विजयी झाले आहेत. महाआघाडीचे पाच सदस्य तर एक अपक्ष उमेदवाराचा विजय झाला.

जीर्णे, पाबळवर ग्रा.पं.वर शेकापचे सरपंच

पेण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेणमधील शेकापच्या होम पिचवरील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत नव्याने प्रस्थापित झालेल्या जीर्णे ग्रामपंचायत शेकापने ताब्यात घेतली. सरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेशा प्रकाश वाघमारे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा २६६ मतांनी दणदणीत पराभव केला आहे. तर पाबळवर शेकापच्या राजश्री जाधव यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश्री शिंदे यांचा ६७ मतांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. मात्र, शेडाशी ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार प्रकाश अरुण कदम यांनी शेकापचे सचिन अशोक सावंत यांचा १९७ मतांनी पराभव केला आहे. पाबळवर गेले ३० ते ३५ वर्षे शेकापचे वर्चस्व कायम आहे. भाजप, शिवसेनेच्या उमेदवार राजश्री नरेश शिंदे यांनी शेकापच्या विजयी उमेदवार राजश्री जाधव यांना चुरशीची लढत देत अवघ्या ६७ मतांनी पराभव स्वीकारला. शेकापचे घटलेले मताधिक्य आत्मचिंतन करायला भाग पाडणारे आहे.
शेडाशी या शेकापच्या होम पिचवर कमळ फुलविले आहे. सरपंचपदाचे भाजपचे उमेदवार प्रकाश कदम यांनी ६५८ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन सावंत यांचा १९७ मतांनी पराभव केला आहे. सचिन सावंत यांना ४६१ मते मिळाली आहेत. एकंदर तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाचे चित्र पाहता जीर्णे ग्रामपंचायत निवडणूक निकाल सोडल्यास शेकापने आपल्या होम पिचवर विरोधकांचा झालेला शिरकाव हा शेकापला निश्चितपणे आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

च्या निवडणूक निकालाचे वैशिष्ट म्हणजे जीर्णे ग्रामपंचायत नव्याने स्थापन झालेली असतानाही शेकापचे संतोष वाघमारे यांनी केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर उमेशा प्रकाश वाघमारे यांचा निर्विवाद विजय शेकापला पाबळ विभागात ताकद देणारा ठरला आहे. जीर्णे ही पाबळ ग्रामपंचायतीमधून विभक्त झालेली ग्रामपंचायत आले.

Web Title: Mahayuti's bet in Neral grampanchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.