Maharashtra Election 2019: We are not in touch with anyone - Sanjeev Naik | महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक
महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही कोणाच्याही संपर्कात नाही - संजीव नाईक

कल्याण : सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. यामध्ये भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. मात्र, आम्ही कोणाच्याही संपर्कात नसल्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी रविवारी कल्याणमध्ये सांगितले.

नाईक हे कल्याण येथील एका मॉलमध्ये ठाणे जिल्हा आगरी समाज संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आगरी गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. आम्ही कोणाच्याही संपर्कात नसल्याचे सांगताना नाईक यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईकही कोणाच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक सरकार बसेल, असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिघे एकत्र येऊन सरकार स्थापन करताहेत, हे महाराष्ट्रातील जनतेसह आमच्यासाठीही एक प्रकारे कुतूहल आहे. भविष्यात काय घडते हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचाच असेल, असे मत मांडले.

Web Title: Maharashtra Election 2019: We are not in touch with anyone - Sanjeev Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.