Maharashtra Election 2019 : ठाण्यात अपहरणकर्ते उमेदवार; जिल्ह्यात ८१ उमेदवारांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 04:58 AM2019-10-12T04:58:38+5:302019-10-12T04:59:49+5:30

विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील सर्व उमेदवारांविरु द्ध एकही गुन्हा दाखल नसल्याचेही त्यामध्ये दिसत आहे. तर, १३२ उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही.

Maharashtra Election 2019: kidnapping candidate in Thane; Crimes against 3 candidates in the district | Maharashtra Election 2019 : ठाण्यात अपहरणकर्ते उमेदवार; जिल्ह्यात ८१ उमेदवारांवर गुन्हे

Maharashtra Election 2019 : ठाण्यात अपहरणकर्ते उमेदवार; जिल्ह्यात ८१ उमेदवारांवर गुन्हे

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत २१३ उमेदवार आपले नशीब आजमावत असून यामधील ८१ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. यात अपहरणाचा गुन्हा असणारे दोन, खुनाचा प्रयत्न करणारा एक आणि हत्यार बागळणे, यासारख्या गंभीर गुन्ह्यांसह राजकीय गुन्हे असणाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील सर्व उमेदवारांविरु द्ध एकही गुन्हा दाखल नसल्याचेही त्यामध्ये दिसत आहे. तर, १३२ उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही.
जिल्ह्यात एकूण ३७२ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यातील छाननीअंती २५१ अर्ज वैध ठरले, तर ३८ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे १८ मतदारसंघांत २१३ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत असून त्यामध्ये २१ आजी-माजी आमदार आणि २४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
महायुती, आघाडी आणि मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह ८२ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञपत्रात व्यवसायापासून शिक्षण, संपत्ती आणि पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचाही तपशील जोडला आहे.
यामध्ये बहुतांश राजकीय गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. तर, इतरही उमेदवारांविरु द्ध फसवणूक, बेकायदा जमाव करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तसेच डोंबिवलीतील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुरबाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांच्याविरु द्ध अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातच नमूद आहे.

राजकीय गुन्ह्यांचा समावेश
राजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. तर, काही उमेदवारांवरील गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वाधिक कल्याण पश्चिममध्ये ९, त्यापाठोपाठ उल्हासनगर ७, भिवंडी व कल्याण पूर्व सहा, कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, बेलापूर आणि ऐरोली या मतदारसंघांत पाच, मुरबाड, अंबरनाथ, मीरा-भार्इंदर येथे चार, शहापूर, भिवंडी पश्चिम तीन, डोंबिवली मतदारसंघात गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या दोन आहे.
एकही गुन्हा दाखल नसलेला मतदारसंघ
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात राजकीय पक्षांसह अपक्ष असे सात उमेदवार आहेत. त्या सातही उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही.

उमेदवारांना द्यावयाची आहे जाहिरातीद्वारे गुन्ह्यांची माहिती
निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मतदारांना द्यावयाची आहे. यासाठी त्यांनी आता तीन दिवस वृत्तपत्र आणि दृक्श्राव्य माध्यमातून जाहिरात द्यावी लागणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: kidnapping candidate in Thane; Crimes against 3 candidates in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.