31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी लाउंज, हुक्का पार्लर सुरूच; कोरोनाचे नियमही धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:55 AM2020-12-29T00:55:13+5:302020-12-29T00:55:18+5:30

अग्निशमन दलाचा परवाना नाही : कोरोनाचे नियमही धाब्यावर

Lounge, Hookah Parlor Continues for 31st December Celebrations! | 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी लाउंज, हुक्का पार्लर सुरूच; कोरोनाचे नियमही धाब्यावर

31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी लाउंज, हुक्का पार्लर सुरूच; कोरोनाचे नियमही धाब्यावर

Next

ठाणे : ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी ठाण्यात मोठ्या प्रमाणात अवैध लाउंज आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच अशा हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही अधिकाऱ्यांनी केवळ घोडबंदर परिसरात कारवाई करण्याचा दिखावा केला.

शिवाय सध्या संचारबंदी असतानाही लाउंज आणि हुक्का पार्लर रात्री साडेअकरानंतरही सुरूच असून सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडत आहे. चार वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल येथील पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत चौदा जणांचा बळी गेला. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच प्रशासनाने अवैध लाउंज व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.            

घोडबंदर परिसरासह ठाणे शहरात अनेक ठिकाणी अवैध लाउंज व हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब मनसेने उघडकीस आणली असून या हुक्का पार्लर रेस्टॉरंटकडे अग्निशमन परवाना नसल्याचीही धक्कादायक बाब पुढे आली आहे. ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणाई अशा हुक्का पार्लरच्या ठिकाणी येत असते. अग्निशमन विभागाचा परवाना नसतानाही बिनदिक्कत लाउंज व हुक्का पार्लर सुरू असून प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. 

काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील अवैध लाउंज व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण अधिकाऱ्यांनी केवळ घोडबंदर परिसरातील एक-दोन लाउंज व हुक्का पार्लरवर कारवाई करत दिखावा केला. पण आजही घोडबंदरसह शहरातील अनेक ठिकाणी अवैध लाउंज व हुक्का पार्लर सुरू आहे. अग्निशमन परवाना नसतानाही हुक्का पार्लरवर कारवाई का होत नाही, असा सवाल महिंद्रकर यांनी केला आहे. यानंतर काय कारवाई हाेत याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Lounge, Hookah Parlor Continues for 31st December Celebrations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.