ठाण्यात लॉकडाऊनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरविणार नागरिकांच्या दारात माफक दरातील कांदे -बटाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 08:53 PM2020-03-31T20:53:10+5:302020-03-31T20:58:56+5:30

संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अल्प दरामध्ये तेही अगदी आपल्या घरातच कांदे आणि बटाटे उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव संकल्पना राबविली आहे. या योजनेनुसार राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि पदाधिकाऱ्यांनी कांदे- बटाटे पुरवठा करण्याचा हा उपक्रम सुरु केला आहे.

Lockedown in Thane to supply NCP at affordable rates at citizens' doorsteps - Onion and Potatoes | ठाण्यात लॉकडाऊनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरविणार नागरिकांच्या दारात माफक दरातील कांदे -बटाटे

ठाण्यातील अनेक गृहसंकुलांमध्ये पुरविले पदाधिकाऱ्यांनी कांदे बटाटे

Next
ठळक मुद्देगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णयठाण्यातील अनेक गृहसंकुलांमध्ये पुरविले पदाधिकाऱ्यांनी कांदे बटाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने संचारबंदीच्या काळात ठाणे शहरातील नागरिकांना थेट दारातच माफक दरामध्ये कांदे आणि बटाटे पुरविण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि पदाधिकाºयांनी कांदे- बटाटे पुरवठा करण्याचा हा उपक्रम सुरु केला आहे.
ठाणे शहरामध्ये कोरोनाचे ११ रु ग्ण सापडले आहेत. सध्या भारत कोरोनाच्या तिस-या टप्प्यात जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना राज्य आणि केंद्र शासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. तरीही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. पर्याय नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष परांजपे यांनी नाशिक येथील शेतकºयांकडून कांदे आणि बटाटे यांची खरेदी केली आहे. यातून तीन किलो बटाटे आणि दोन किलो कांदे यांची एकत्रित पिशवीच थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची सुरुवात केली आहे. सध्या बाजारामध्ये कांदा ३० तर बटाटे ४० रु पये दराने विकले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या वतीने १८० रुपयांच्या या वस्तू अवघ्या शंभर रुपयांमध्ये पोहचविल्या जाणार आहेत.
मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा उपक्रम सुरु केला आहे. ३१ मार्च रोजी राष्ट्रवादीचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभाध्यक्ष नितीन पाटील, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रत्नेश दुबे, निलेश कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष दीपक पाटील, युवक ब्लॉक अध्यक्ष रोहित भंडारी, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता आणि हॉकर्स सेलचे अध्यक्ष सचिन पंधारे आदींनी कांदे-बटाटयाच्या पिशव्या विविध गृहसंकुलांमध्ये वितरीत केल्या आहेत. या उपक्र माला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विविध भागांमधून दूरध्वनीद्वारे कांदे-बटाट्यांची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात शहराध्यक्ष परांजपे यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांनी घरातच राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच मागणी करणा-या प्रत्येक सोसायटी, गृहसंकुल आणि विभागाच्या दारात कांदे-बटाटे पोहचविले जाणार आहे. ज्यांना कांदे-बटाटे यांची गरज असेल, त्यांनी ९३२१८०८०२१ किंवा ०२२-२५३८६४६४ आणि ०२२- २५३८६५६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही परांजपे यांनी केले आहे.

Web Title: Lockedown in Thane to supply NCP at affordable rates at citizens' doorsteps - Onion and Potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.