लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 03:03 PM2021-04-06T15:03:12+5:302021-04-06T15:03:34+5:30

महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते.

Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar | लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर - आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असे गाजर दाखवून, ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केल्याचा आरोप व्यापारी संघटनेनी केला. सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून दुकाने बंदमुळे हजारो कामगाराचा रोजगार गेला असून भाजपानेही विरोध करीत निदर्शने केली.  (Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar)

देशात औधोगिक शहर म्हणून उल्हासनगरचे नावलौकिक असून शहरात निर्माण होणाऱ्या जीन्स पॅन्टला देशात मागणी आहे. तर जपानी व गजानन मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून फर्निचर, बॅग, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूला मोठी मागणी आहे. अश्या औधोगिक शहरातील दुकाने बंद राहिल्यास दुकानदारासह दुकाना मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ राज्य शासनाने घेतलेल्या लॉकडाऊन निर्णयामुळे येणार असल्याचा आरोप युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, कार्याध्यक्ष दीपक छतलानी, भाजप व्यापारी मंडळचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, व्यापारी संघटनेचे परमानंद गिरेजा आदींनी केली. तसेच भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदींनी शासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

 महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. अखेर पोलीस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांनी व्यापारी नेत्या सोबत चर्चा करून शासनाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवारी असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणार, असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. प्रत्यक्षात ३० एप्रिल पर्यंत कडक लोकडाऊन जारी केला असून व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची टीका व्यापारी संघटने कडून केली. आठवड्यातून ५ दिवस लॉकडाऊन काळात दुकानांना उघडण्यास मुभा देण्याची मागणी होत आहे. असे न झाल्यास शहरातील दुकानदार देशोधडीला लागण्याची शक्यता सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे. 

व्यापारी संघटना मुख्यमंत्री यांना साकडे
उल्हासनगर औघोगिक शहर असून लॉकडाऊन मुळे ही ओळख मिटण्याची शक्यता आहे. आठवड्यातून काही दिवस दुकाने सुरू ठेवण्याला मान्यता देण्यासाठी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेऊन साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिलीं. दरम्यान भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांना भेटून शहरातील समस्या बाबत माहिती दिली.

Web Title: Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.