ठाण्यातील संगीत कट्ट्यावर दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 05:07 PM2020-10-03T17:07:40+5:302020-10-03T17:11:07+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी यांना संगीत कट्ट्यावर संगीत साधना करण्यात आली.

The late singer S.P. Tribute to Balasubramaniam | ठाण्यातील संगीत कट्ट्यावर दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली

ठाण्यातील संगीत कट्ट्यावर दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली

Next
ठळक मुद्देएस.पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजलीकोरोनावर मात करण्यासाठी संगीत कट्ट्यावर संगीत साधनाबालसुब्रमण्यम यांची लोकप्रिय गीते सादर

ठाणे : ४० हजारांहून अधिक गाणी गाऊन संगीत विश्वात मैलाचा दगड प्रस्थापित करणाऱ्या तसेच, नव्वदचे दशक खºया अर्थाने आपल्या नावावर करणाºया दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून आदरांजली देण्यात आली. कोरोनासारख्या भीषण परिस्थीतीत संगीत कट्टा क्रमांक ६४वर या निमित्ताने संगीत साधना करण्यात आली.

 यावेळी रसिकांनी हा कट्टा आॅनलाईन अनुभवला. जवळपास १६ भाषांमध्ये बालसुब्रमण्यम यांनी गाणी गायली. कमल हासन आणि सलमान खान या अभिनेत्यांसाठी त्यांचा आवाज प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. दाक्षिणात्य गायकाला हिंदी उच्चार जमत नाहीत हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ‘‘एक दूजे के लिए’चे संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा बालसुब्रमण्यम यांच्या नावालाच विरोध होता. परंतू चित्रपटाच्या कथानकात, नायक दाक्षिणात्य आहे, त्याचे गाण्यातले उच्चारही दाक्षिणात्य असले तर काही बिघडत नाही, असे सांगत के. बालचंदर यांनी ती हरकत मोडून काढली. ‘तेरे बीच मे कैसा हे ये बंधन अंजाना’ या गाण्यासाठी एसपींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला या त्यांच्या आठवणी उलगडताना विनोद पवार यांनी ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील हे गाणे सादर केले. माधुरी कोळी यांनी त्यांच्या निवेदनात सुब्रमण्यम यांचे अनेक किस्से सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तर संगीत कट्ट्याच्या गायकांनी त्यांची लोकप्रिय गाणी देऊन त्यांना आदरांजली वाहिली. कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी आपल्या मनोगतात वुई आर फॉर यू या उपक्रमांतर्गत कोरोनाकाळात करीत असलेल्या कामांसंदर्भात माहिती दिली. दरम्यान, हरिश सुतार यांनी ‘रोझा’ चित्रपटातील ‘ रोझा जाने मन’, राजू पांचाळ यांनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील ‘मेरे रंग में’ रंगनेवाली’, हरिश सुतार आणि गौरी ठाकूर यांनी ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील ‘हम आपके हैं कौन’, राजू पांचाळ आणि निशा पांचाळ यांनी ‘ मैने प्यार किया’ चित्रपटातील ‘आते जाते’, हरिश सुतार यांनी ‘लव्ह’ चित्रपटातील ‘मॅगी मेरी प्रियतमा’, विनोद पवार आणि निशा पांचाळ यांनी ‘वंश’ चित्रपटातील ‘आहे तेरी बाहेर में’, विनोद पवार आणि निशा पांचाळ यांनी ‘लव्ह’ चित्रपटातील ‘साथियॉं तूने क्या किया’, हरिश सुतार आणि गौरी ठाकूर यांनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील ‘आजा शाम होने आई’, समीर दळवी यांनी ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील ‘पहला पहला प्यार है’, हरिश सुतार आणि गौरी ठाकूर यांनी ‘रोझा’ चित्रपटातील ‘ये हँसी वादीयॉं’ तर हरिश सुतार यांनी ‘सागर’ चित्रपटातील ‘सच मेरे यार हैं’ ही गाणी सादर केली.

Web Title: The late singer S.P. Tribute to Balasubramaniam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.