Kolhapur pattern of development was also seen in Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेतही पाहायला मिळाला महाविकास आघाडीचा कोल्हापूर पॅटर्न
ठाणे महापालिकेतही पाहायला मिळाला महाविकास आघाडीचा कोल्हापूर पॅटर्न

ठाणे : कोल्हापूर महापालिकेत झालेला महाविकास आघाडीचा पॅटर्न ठाणे महापालिकेत देखील पाहायला मिळाला. अपेक्षेप्रमाणेच महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातही बिनविरोध निवड झाली. यावेळी संपूर्ण महापालिका मुख्यालयात तसेच बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पालिका मुख्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे पालिका मुख्यालयात येणार आहेत. यानंतर भव्य मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे.

Web Title: Kolhapur pattern of development was also seen in Thane Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.