शिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : इतिहास अभ्यासक अजित मोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:19 PM2020-01-29T17:19:26+5:302020-01-29T17:22:42+5:30

इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून उपस्थितांना अफजलखानाचा वध इतिहास ज्ञात अज्ञात या विषयावर संबोधित केले.

Knowledge of Shivcharitra's study is essential | शिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : इतिहास अभ्यासक अजित मोघे

शिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : इतिहास अभ्यासक अजित मोघे

googlenewsNext
ठळक मुद्देशिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : अजित मोघेअफजलखानाचा वध ज्ञात - अज्ञात इतिहास या विषयावर मोघे यांचे व्याख्यान महाराजांच्या कार्याचा अभ्यास डोळसपणे करण्याची गरज : अजित मोघे

ठाणे: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना देवाचा अवतार मानून त्यांची पूजा करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, पण त्याच वेळी महाराजांच्या खºया कार्याची आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने मांजणी करुन ज्ञानमार्गावरुन वाटचाल करण्याची खरी गरज असल्याचे इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी सांगितले.
           ठाण्याच्या विष्णुनगर माघी गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६३ वे वर्ष आहे. त्या निमित्ताने मंगळवारी आयोजित केलेल्या अफजलखानाचा वध ज्ञात - अज्ञात इतिहास या विषयावर मोघे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. महापालिका शाळा क्र. १९ शाळेच्या सभागृहात हे व्याख्यान पार पडले. शिवचरित्राचा अभ्यास का व कसा करायचा या विषयी बोलताना मोघे म्हणाले की, महाराजांपुर्वी देखील सह्याद्री होता, त्यावरील उत्तुंग गरिदुर्ग होते, गनिमी कावा होता, शूर आणि स्वामिनिष्ठ सैनिक होते, मुत्सद्दी होते, तत्त्वविवेचक पंडीत होते आणि धर्मपरायण प्रजा पण होती. पण या सर्वांच्या योग्य समन्वय साधून महाराजांपुर्वी कोणीही स्वराज्य स्थापन करु शकला नाही. नेमके इथेच महाराजांचे मोठेपण आहे. महाराजांच्या कार्याचा अभ्यास सामान्य माणसापासून असामान्यांपर्यंत सर्वांनीच अधिक डोळसपणे करण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. जगात सर्वच प्रगत देशांमध्ये इतिहासाचा उपयोग जिज्ञासापुर्तीसाठी होतो दुर्दैवाने भारतात इतिहासाचा उपयोग फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी होतो. याचे उदाहरण देताना ते पुढे म्हणाले की, फ्रान्समधील राष्ट्रपुरूष नेपोलीयन या व्यक्तीवर तेथील राष्ट्रीय संग्रहात २७ हजार ग्रंथ आहेत. महाराजांच्या लौकीक पराक्रमाच्या गोष्टी आपण ओरडून सांगतो पण त्यांच्या अलौकीक पराक्रमाच्या गोष्टी जगासमोर येण्याची गरज आहे. शिवाजी या शब्दाचा मुळात अर्थ व्यवस्था आहे. अलौकीक म्हणजे महाराजांचे प्रशासन व्यवस्था, शासन व्यवस्था आणि प्रशासकीय निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी, प्रशासनातील करडी शिस्त या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अफजल खान या प्रश्नाला जावळी हे उत्तर महाराजांनी १६४९ साली आपल्या कल्पनेत रचले आणि ते १६५९ ला वास्तवात साकारले यावर अधिक बोलताना मोघे म्हणाले की, एक सेनापती म्हणून शिवाजी महाराजांची महानता यातून प्रतित होते की, स्वराज्यावर कोसळणारे अफजलखानचे संकट त्यांनी दहा वर्षे पुढे ढकलले. मुळात १६४९ ला तो चालून आला होता पण कोवळ््या स्वराज्याला हे न झएपणारे युद्ध आहे ही महत्त्वाची बाब महाराजांच्या लक्षात आली. अफजलखानला रणांगणात खेचण्यासाठी त्याला प्रतिकूल आणि आपल्याला अनुकूल अशी युद्धभूमी म्हणजे जावळी. ती आपल्या ताब्यात आता नसल्यामुळे अफजलखान या संकटाला हात घालण्यात अर्थ नाही हे ओळखून हे युद्ध महाराजांनी पुढे ढकलले.

Web Title: Knowledge of Shivcharitra's study is essential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.