मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी केडीएमसीची अभय योजना; महापौर, आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:24 AM2020-10-13T01:24:28+5:302020-10-13T01:24:36+5:30

१०० कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित

KDMC's Abhay Yojana for property tax arrears; Mayor, Commissioner's announcement | मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी केडीएमसीची अभय योजना; महापौर, आयुक्तांची घोषणा

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी केडीएमसीची अभय योजना; महापौर, आयुक्तांची घोषणा

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीतील मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी एकरकमी २५ टक्के रक्कम महापालिकेत भरल्यास त्यांच्या थकबाकीवरील ७५ टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाईल. ही योजना १५ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लागू राहणार आहे.

अभय योजनेची घोषणा महापौर विनीता राणे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी आयुक्तांच्या दालनात केली. यावेळी सभागृह नेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, मालमत्ता विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

यासंदर्भात सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून केडीएमसीची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. तरीही, महापालिकेने मालमत्ताकराची आतापर्यंत १३९ कोटी वसुली केली आहे. ही वसुली मागच्या वर्षीच्या तुलनेत २३ कोटी रुपयांनी कमी आहे. महापालिका हद्दीत थकबाकीदारांकडून एकूण एक हजार ३८२ कोटी रु पये येणे अपेक्षित आहे. सगळीच थकबाकी वसूल होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दूर झालेला नाही. मात्र, कोरोना रु ग्णांची संख्या सध्या स्थिरावलेली आहे. या अभय योजनेतून थकबाकीदारांकडून किमान १०० कोटी रु पये वसूल होणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ थकबाकीदारांनी घेऊन योजनेला प्रतिसाद द्यावा. तसेच या योजनेतून जमा होणारे उत्पन्न हे कोरोना प्रादुर्भाव दूर करण्यावर खर्च केले जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

वास्तववादी अपेक्षा
यापूर्वीही मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. तेव्हा एक हजार कोटी रु पये वसुलीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ६५ कोटी रु पये वसूल झाले होते. त्यामुळे आताही अभय योजनेला प्रतिसाद मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला असता आयुक्तांनी अपेक्षित उत्पन्न हे १०० कोटी रुपये धरले आहे. वास्तववादी आकडे अपेक्षित ठेवले आहेत. त्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: KDMC's Abhay Yojana for property tax arrears; Mayor, Commissioner's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.