'ठामपा क्षेत्रातील नादुरूस्त चेंबर्स कव्हर्सची पाहणी करुन तातडीने कार्यवाही करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 01:27 PM2020-07-10T13:27:28+5:302020-07-10T13:27:36+5:30

ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांचे प्रशासनाला आदेश

'Investigate faulty chambers covers in Thampa area and take immediate action' | 'ठामपा क्षेत्रातील नादुरूस्त चेंबर्स कव्हर्सची पाहणी करुन तातडीने कार्यवाही करा'

'ठामपा क्षेत्रातील नादुरूस्त चेंबर्स कव्हर्सची पाहणी करुन तातडीने कार्यवाही करा'

Next

ठाणे  :  पावसाळ्यात कोणतीही  जीवित तसेच वित्तहानी होऊ नये यासाठी  शहरातील सर्व मुख्य रस्ते तसेच उपरस्त्यांच्या बाजूचे फूटपाथ आणि गटार यांची पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला शुक्रवारी दिले. ज्या ठिकाणी  नादुरूस्त चेंबर्स कव्हर्स असतील तसेच ज्या ठिकाणी चेंबर कव्हर्स नसतील त्या ठिकाणी त्वरीत चेंबर्स कव्हर्सची दुरुस्ती किंवा नवीन कव्हर्स बसविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

यानुसार प्रभाग समितीनिहाय चेंबर्सची झाकणे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नौपाडा –कोपरी, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा, माजीवडा, वर्तकनगर, लोकमान्य सावरकरनगर, वागळे प्रभाग समिती या क्षेत्रात एकूण ३५५ चेंबर्स झाकणे बसविण्यात येणार असून एकूण २३६ ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित चेंबर्स झाकणे बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. चेंबर्सच्या झाकणाअभावी कोणताही अपघात होऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठीत सर्व प्रभाग समितीमध्ये कार्यवाही सुरू असून त्याची पाहणीही संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. तसेच चेंबर्ससंदर्भात नागरिकांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्या तक्रारीचे निरसन तातडीने करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 'Investigate faulty chambers covers in Thampa area and take immediate action'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.