भारत आर्थिक मंदीच्या गर्तेत नाही - भातखळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:52 PM2019-09-21T23:52:30+5:302019-09-21T23:52:47+5:30

राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

India is not in the throes of economic recession - Bhatkhalkar | भारत आर्थिक मंदीच्या गर्तेत नाही - भातखळकर

भारत आर्थिक मंदीच्या गर्तेत नाही - भातखळकर

Next

ठाणे : जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आल्याने त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. परंतु, भारत मंदीच्या गर्तेत सापडलेला नसल्याचा दावा भाजपचे प्रदेश महासचिव अतुल भातखळकर यांनी केला. तसेच केंद्रातील भाजप सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपच्या ठाणे-कोकण विभागाच्या मीडिया सेंटरचा शुभारंभ भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाणे आणि कोकण भागात सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सध्या मागील १०० दिवसांत भाजप आणि मित्रपक्षाने मिळून ज्या वेगाने मोदी सरकारने जनतेच्या हिताची कामे केली आहेत, त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत मिळेल. तसेच जागतिक स्तरावर मंदी असल्याने त्याचा फटकाही भारताला बसला आहे. मात्र, आर्थिक मंदीच्या गर्तेत भारत अडकलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही विकासाचा स्तर हा चार ते साडेचार टक्के होता. आता मोदी सरकारच्या काळात स्तर चांगल्या म्हणजेच पाच टक्कयांवर असल्याचे त्यांनी सांगितले.

कळवा-मुंब्रा किंवा भिवंडीतील मतदारसंघ असोत, या सर्वच ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या जागा वाढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजपची युती होईल का, असा सवाल त्यांना विचारला असता, युती १०० टक्के होणार असून त्याची घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवारांना नैराश्य
पुलवामा हल्ल्यासंदर्भात राष्टÑवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा वक्तव्य केले असल्याने त्याचा काय परिणाम होईल, असा सवाल त्यांना केला असता, पवार यांना नैराश्य आले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. येत्या काळात राष्टÑवादीचा पूर्णपणे सफाया झालेला असेल आणि तेच पक्षात शिल्लक राहिलेले असतील, असाही टोला त्यांनी लगावला.

Web Title: India is not in the throes of economic recession - Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा