ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 01:05 AM2020-09-13T01:05:02+5:302020-09-13T01:05:27+5:30

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

An increase of 2079 patients in Thane district on Saturday; The growing number of corona patients adds to the anxiety | ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी तर तब्बल दोन हजार ७९ रुग्णांची नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ४४ हजार १७२ झाली आहे. तर, २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ८९३ झाली आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे ८८९ मृत्यूची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात ५७८ रुग्णांची वाढ झाली.
उल्हासनगर महापालिका परिसरात तीन मृत्यूंसह ३९ नवे रुग्ण आढळले. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४० बाधित आढळले, तर एकाचाही मृत्यू झाला नाही.
आता बाधितांची संख्या चार हजार ४७४ झाली असून मृतांची संख्या २९५ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २४७ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मृतांचा आकडा ४६८ वर पोहोचला आहे.
अंबरनाथमध्ये ५० रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ४४६, तर मृतांची संख्या २०४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ९२० झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात २६४ रुग्णांची वाढ झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. आता बाधितांची ११ हजार २५७ आणि मृतांची संख्या ३३८ झाली आहे.

नवी मुंबईत ३० हजारचा टप्पा पूर्ण
नवी मुंबई : शहरात शनिवारी ३८१ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ३०२९५ झाली आहे. उपचारादरम्यान दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये १ लाख ५८ हजार १५ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ८१ टक्के अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभरात ३५९ रूग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६१३५ झाली आहे.

रायगड जिल्ह्यात आढळले ८९३ रूग्ण
अलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ८९३ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ३६ हजार ३४३ वर पोचली आहे. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत एकूण ९८८ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. आतापर्यंत २८ हजार ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

वसई-विरारमध्ये
२५९ नवीन रुग्ण
वसई : वसई-विरार शहरात शनिवारी दिवसभरात २५९ नवे रुग्ण आढळून आले असून २०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार १६६ वर पोहोचली आहे. तर एकूण मुक्त रुग्णांची संख्या १६ हजार ६९९ इतकी झाली आहे.

Web Title: An increase of 2079 patients in Thane district on Saturday; The growing number of corona patients adds to the anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.