ठाणे जिल्हा पालकमंत्र्यांकडून स्वातंत्र्य दिनी रानभाज्या प्रदर्शनचे उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:16 PM2020-08-15T13:16:23+5:302020-08-15T13:16:31+5:30

आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे.

Inauguration of Vegetable Exhibition on Independence Day by Thane District Guardian Minister | ठाणे जिल्हा पालकमंत्र्यांकडून स्वातंत्र्य दिनी रानभाज्या प्रदर्शनचे उद्घाटन 

ठाणे जिल्हा पालकमंत्र्यांकडून स्वातंत्र्य दिनी रानभाज्या प्रदर्शनचे उद्घाटन 

Next

ठाणे :  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभास  खासदार राजन विचारे,श्रीकांत शिंदे  आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी  राजेश  नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार,ठाणे मनपा आयुक्त  पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. 

सदरचा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्वोरमेंटल सोसायटी यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन व विक्री साठी ठेवण्यात होते. आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे या करता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी हि संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषि विभागाचे धोरण आहे.

रानभाज्यांमध्ये कंदभाज्या,हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

Web Title: Inauguration of Vegetable Exhibition on Independence Day by Thane District Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.