छंद प्रेमींनी अनुभवले ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शन, राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल नवीन पिढीमध्ये उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 03:42 PM2020-06-28T15:42:40+5:302020-06-28T15:46:49+5:30

सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी सलग 14 दिवस मान्यवरांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली.

Hobby lovers experienced online signature display, guided by Satish Chafekar | छंद प्रेमींनी अनुभवले ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शन, राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल नवीन पिढीमध्ये उत्सुकता

छंद प्रेमींनी अनुभवले ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शन, राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल नवीन पिढीमध्ये उत्सुकता

Next
ठळक मुद्देफेसबुक लाईव्ह माध्यमातून ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शनसह्याजीराव सतीश चाफेकर यांनी उलगडला प्रवासराजकारण्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल नवीन पिढीमध्ये उत्सुकता


ठाणे : लॉकडाऊनमुळे प्रथमच छंद प्रेमींनी ऑनलाइन स्वाक्षरी प्रदर्शन अनुभवले. लागोपाठ पाच वेळा लिम्का रेकॉर्डचे मानकरी ठरलेले ठाण्याचे सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी आपल्या 51 वर्षांच्या सह्यांच्या दुनियेचा प्रवास फेसबुक लाईव्ह माध्यमातून छंद प्रेमींसमोर उलगडला. याचबरोबर प्रत्येक स्वाक्षरीची त्यांनी सविस्तर माहिती सलग १४ भागांतून दिली. इंदिरा गांधी , जवाहरलाल नेहरू, नरेंद्र मोदी , शरद पवार यांच्या स्वाक्षऱ्याबद्दल प्रेक्षकांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले तर बाळासाहेब ठाकरे यांची स्वाक्षरी केलेली एकमेव बॅट पाहून अनेकजण अक्षरशः आश्चर्यचकित झाले. 
            १५ जून ते २८ जून या कालावधीत फेसबुकवर त्यांनी स्वाक्षऱ्यांचा प्रवास प्रेक्षकांना सांगितला. ज्यांना जागेची व पैशांची अडचण आहे ते भविष्यात अशा प्रकारे लाईव्ह प्रदर्शन करू शकतात असे चाफेकर यांनी लोकमतला सांगितले. बऱ्याच स्वाक्षऱ्या कशा मिळवल्या आणि स्वाक्षरी आणि माणसाचा स्वभाव यावरही त्यांनी  मार्गदर्शन केले.नवीन लोकांकडून राजकीय नेत्यांच्या स्वाक्षऱ्यांबद्दल उत्सुकता असल्याचे निरीक्षण चाफेकर यांनी नोंदविले. तसेच, प्रत्येकाला स्वतःच्या स्वाक्षरीबद्दल कुतुहल होते, त्या अनुषंगाने देखील प्रश्न विचारले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, आपल्या स्वाक्षऱ्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना स्वाक्षऱ्या व्हाट्सएप आणि इ मेलवर प्रेक्षकांनी पाठविल्या.   वर्ल्ड कप १९८३ च्या सामन्यात खेळलेले बलविंदर सिंग संधू, क्रिकेटर रॉबिन मॉरिस, भारतीय संघात १९७१ मध्ये कसोटी सामना खेळलेले के. जयंतीलाल यांनी देखील हे प्रदर्शन लाईव्ह पाहून कौतुक केले तर दुसरीकडे प्रवीण दवणे ,चंद्रशेखर टिळक , सचिदानंद शेवडे यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमात  सर डॉन ब्रॅडमन , सचिन तेंडुलकर, गॅरी सोबर्स, एकनाथ सोलकर , कपिल देव, राहुल द्रविड यांच्यापासून अनेक क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या दाखऊन आपले अनुभव ही सांगितले.. जवळजवळ त्यांनी ३०० च्या आसपास क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या बॅट्स वर पहिल्या. आचार्य अत्रे,  श्यामची आई या चित्रपटात श्यामच्या आईचे काम केलेल्या वनमाला तर श्यामचे काम करणारे माधव वझे यांची स्वाक्षरी तसेच, किशोरी आमोणकर , पंडित भीमसेन जोशी, कवी सोपानदेव चौधरी, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर , अभिनेते  धर्मेंद्र , अमिताभ बच्चन , वहिदा रहेमान , मुबारक बेगम, अशा भोसले,  यांच्याही स्वाक्षऱ्या त्यांनी दाखविल्या.

Web Title: Hobby lovers experienced online signature display, guided by Satish Chafekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.