एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना राष्ट्रवादीकडून मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:20 PM2021-07-22T12:20:46+5:302021-07-22T12:21:31+5:30

Thane Rain Update: सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. बदलापुरातही जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानक येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्यरात्री १२ पासून अडकली आहे.

Help from NCP to passengers stranded in express | एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना राष्ट्रवादीकडून मदत 

एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना राष्ट्रवादीकडून मदत 

Next

बदलापूर - सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. बदलापुरातही जोरदार पाऊस सुरू असून पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानक येथे सिद्धेश्वर एक्स्प्रेस मध्यरात्री १२ पासून अडकली आहे. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बदलापूर शहर पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात धाव घेतली. गाडीतील प्रवाशांसाठी नाश्ता, पाणी यांचे वाटप केले. रात्रभर अडकून पडलेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला.  (Help from NCP to passengers stranded in express) रात्रीपासून पाऊस पडत असल्याने 2019 मध्ये बदलापूर आणि वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात अडकलेली होती त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूर स्थानकात थांबविण्यात आली होती.

Web Title: Help from NCP to passengers stranded in express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे