शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
3
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
4
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
5
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
6
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
7
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
8
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
9
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
10
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
11
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
12
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
13
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
14
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
15
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
16
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
17
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
18
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
19
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
20
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 07:15 IST

ठाणेकडून येणाऱ्या आणि वर्सावेकडून ठाण्यास जाणाऱ्या घोडबंदरमार्गावर  रस्ता मजबुतीकरणाचे काम ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले आहे.

मीरा रोड : घोडबंदर मार्गावरील मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील तीन ठिकाणी रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी रविवारी पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. मात्र, यापूर्वी अशा कामासाठी जाहीर केलेली अवजड वाहन बंदी फोल ठरली होती. त्यामुळे यावेळीही ती फोल ठरल्यास वाहतूककोंडीची शक्यता आहे.

ठाणेकडून येणाऱ्या आणि वर्सावेकडून ठाण्यास जाणाऱ्या घोडबंदरमार्गावर  रस्ता मजबुतीकरणाचे काम ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर ते ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले आहे. पालघर - विरार - वसई बाजूकडून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर येण्यास मनाई असून, त्यांना शिरसाड फाटा - पारोळ - अंबाडी मार्गे;  चिंचोटी मार्गे-कामन-खारबांव-अंजुरफाटा, भिवंडी येथून पर्यायी मार्गे जावे लागणार आहे. तर पश्चिम द्रुतगती मार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणेकरिता जाण्यासाठी फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे.

वाहतूक पोलिस तैनात

दुरुस्ती कामावेळी अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यासह रस्ते मार्गिका वळवण्यात येणार असल्याने होणारी वाहतूककोंडी पाहता मीरा भाईंदर वाहतूक शाखेमार्फत नियोजन केले गेले आहे.

बंदोबस्तासाठी १० वाहतूक पोलिस अधिकारी व ४५ पोलिस कर्मचारी प्रत्येकी ३ पाळ्यांमध्ये नेमल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक सागर इंगोले यांनी दिली.

भीमाशंकरला भरधाव निघालेली कार घोडबंदर रोडवर जळून खाक

घोडबंदर रोडवर शुक्रवारी रात्री एका कारने अचानक पेट घेतला. या घटनेत भाईंदरहून भीमाशंकरला निघालेल्या कारचालकासह चार प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेमुळे पातलीपाडा उड्डाणपुलाहून ठाण्याकडे येणारी वाहतूक तासभर खोळंबली होती.       अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ३५ ते ४० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

 या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, एक फायर वाहन पाचारण करण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ghodbunder Road Heavy Vehicle Ban Today: Will Traffic Ease?

Web Summary : Heavy vehicles are banned on Ghodbunder Road today for road repairs. Past bans failed, raising congestion concerns. Traffic police are deployed. A car fire caused an hour-long traffic jam.