पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून फेब्रुवारीमध्ये कल्याणमध्ये येणार - डॉ. श्रीकांत शिंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 01:47 AM2020-01-19T01:47:37+5:302020-01-19T01:48:12+5:30

पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन मार्च २०२० अखेरपर्यंत पूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Girdar of Patripul will arrive from Hyderabad in Kalyan in February - Dr. Shrikant Shinde | पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून फेब्रुवारीमध्ये कल्याणमध्ये येणार - डॉ. श्रीकांत शिंद

पत्रीपुलाचे गर्डर हैदराबादहून फेब्रुवारीमध्ये कल्याणमध्ये येणार - डॉ. श्रीकांत शिंद

Next

डोंबिवली : हैदराबाद येथे तयार केलेल्या दुसऱ्या पत्रीपुलाच्या गर्डरची पाहणी शनिवारी रेल्वेचे तांत्रिक अधिकारी, एमएसआरडीसी अधिकारी शशिकांत सोनटक्के आणि राइट संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केली.

१० दिवसांत या गर्डरचे सुटे भाग करून फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात हा गर्डर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आणला जाणार आहे. त्यानंतर, त्याची पुनर्जोडणी करून रेल्वेचा मेगाब्लॉक घेऊन हा गर्डर बसवण्यात येणार आहे.

गर्डरची संपूर्ण तपासणी केल्यानंतर राइट संस्थेने ते कल्याणला आणायला मंजुरी दिली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात आलेल्या दुस-या पत्रीपुलाच्या कामाला गती मिळणार आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन मार्च २०२० अखेरपर्यंत पूल तयार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
जुना पत्रीपूल पाडल्यानंतर कल्याण पूर्व-पश्चिम प्रवासासाठी नागरिकांना होणारा त्रास, वेळेचा अपव्यय आणि रहदारीची
समस्या सोडवण्यासाठी दुसºया पत्रीपुलाचे काम सुरू करण्यासाठी शिंदे यांनी रेल्वे प्रशासन तसेच एमएसआरडीसीकडे सातत्याने पाठपुरावा केला. ८ जानेवारीला त्यांनी महापौर विनीता राणे, रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी, एमएसआरडीसीचे अधिकारी यांच्यासमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पुलाच्या कामाची पाहणी केली होती.
 

Web Title: Girdar of Patripul will arrive from Hyderabad in Kalyan in February - Dr. Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.