Four iron beams have been installed on the Kopari railway bridge in Thane | ठाण्यातील कोपरी रेल्वे पुलावर चार लोखंडी तुळई बसविण्याचे काम पूर्ण

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली झाले काम

ठळक मुद्देपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली झाले काम रेल्वेने प्रथमच आणली १२०० टन वजन पेलणारी महाकाय क्रेन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पूर्व द्रूतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाजवळील भुयारी मार्गावर लोखंडी तुळई बसविण्याचे काम रविवारी पहाटे काही प्रमाणात पूर्ण झाले. उर्वरित काम आता रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी या वेळेत पूर्ण केले जाणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हेही यावेळी उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या कोपरी पूलावर पहिल्या टप्यातील सात लोखंडी तुळई (गर्डर) पैकी चार गर्डर रविवारी पहाटेपर्यंत बसविण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही रविवारी पहाटे २.३० वाजेपर्यंत या कामाच्या निगराणीसाठी उपस्थित होते. ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील तसेच मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (प्रकल्प निर्माण) एस. एस. चतुर्वेदी, उप अभियंता (प्रकल्प निर्माण) डी.डी. लोळगे, स्टेशन डेव्हलपमेंट मुख्य अभियंता आर. के. मिश्रा, उप अभियंता (पूल) अखिलेश सक्सेना, मध्य रेल्वे वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भामरे आणि कार्यकारी अभियंता विनय सुर्वे आदी अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे काम पार पडले. प्रत्येकी १०४ टन वजनाचे आणि ६५ मीटर लांबीचे चार गर्डर मुंबई ते ठाण्याच्या दिशेने बसविण्यात आले. हे गर्डर उचलण्यासाठी भारतात प्रथमच मध्य रेल्वे प्रशासनाने १२०० टन वजन पेलणारी क्र ेन कोपरी येथे पाचारण केली होती. त्यामुळे हा महत्वपूर्ण ऐतिहासिक क्षण याचि देहि याचि डोळा पाहण्यासाठी रेल्वेचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी याकिाणी उपस्थित होते. हे गर्डर बसविण्यासाठी सात क्र ेन, दोन पुलर आणि १५० हून अधिक मनुष्यबळ तैनात होते.
* यानंतर ठाणे ते मुंबई बाजूसाठी असेच तीन गर्डर बसविण्यात येणार आहेत. याआधी एमएमआरडीएने १६ आणि १७ जानेवारी रोजी ३५ मीटर लांब आणि प्रत्येकी ३५ टन वजनाच्या सात तुळई अवघ्या सात तासांमध्ये बसविल्या होत्या.
* तुळई बसविण्याच्या कामामुळे मुंबईतून ठाण्याकडे येणारी वाहतूक मुलूंडमध्ये मोठया प्रमाणात तुंबली होती. त्यामुळे अनेकांना अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन ते तीन तासांची कसरत करावी लागली. या वाहतूकीवर नियंत्रण आणतांना मुंबई पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचे पहायला मिळाले. त्या तुलनेत ठाणे शहरात मात्र, पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरु होती.

Web Title: Four iron beams have been installed on the Kopari railway bridge in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.