डोंगराच्या तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुल्डोझर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 06:20 PM2021-07-30T18:20:32+5:302021-07-30T18:22:33+5:30

Thane : वनविभागाने केलेल्या सव्र्हेत अतिक्रमणांची यादी आता पुढे आली आहे. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

Forest department to bulldoze over 1,200 houses on steep slopes | डोंगराच्या तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुल्डोझर! 

डोंगराच्या तीव्र उतारावरील तब्बल १२०० घरांवर वनविभाग फिरवणार बुल्डोझर! 

Next

ठाणे : घोलाई नगर भागात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता घोलाई नगरसह पारसिक, इंदिरानगर, आतकोनेश्वर नगर, भास्करनगर, पौंडपाडा, कारगिल खोंडा आदींसह इतर भागातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असलेल्या तब्बल १२०० अतिक्रमणांवर आता वनविभाग बुल्डोजर फिरविणार असल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाने केलेल्या सव्र्हेत अतिक्रमणांची यादी आता पुढे आली आहे. त्यानुसार आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन ही कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

कळव्यातील घोलाईनगर भागात १९ जुलै रोजी झालेल्या पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला होता. त्यानंतर डोंगरावरील बांधकामांची समस्या पुढे आली. या घटनेनंतर वनविभागावर टिका झाल्यानंतर त्यांनी मागील काही दिवसापासून डोगंरावरील तीव्र उतारांच्या अतिक्रमणांचा सव्र्हे सुरु केला होता. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार डोंगराच्या तीव्र उतारावर तब्बल १२०० अतिक्रमण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामध्ये आतकोनेश्वरनगर, भास्करनगर, इंदिरानगर, घोलाई नगर, पौंडपाडा, वाघोबा नगर आणि कारगिल खोंड या भागात हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार आता जो अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार आता याठिकाणाच्या अतिक्रमणाना घरपट्टी केव्हा लावली गेली, पाणी केव्हा दिले गेले, वीज केव्हा दिली गेली याची माहिती आता वनविभागाकडून गोळा केली जात आहे. त्यातील किती अतिक्रमणो जुनी आणि नवीन आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याच अनुषंगाने महापालिका आणि महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

वनविभागाच्या माध्यमातून आता या डोंगरावरील तीव्र उतारावरील अतिक्रमणांवर कारवाई करतांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानुसार येथील बांधकामधारकांकडून देखील सोमवार पासून माहिती मागविली जाणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत बांधणार
वनविभागाच्या माध्यमातून तीव्र उतारावील १२०० बांधकामे येत्या ऑगस्ट महिन्यात हटविणार आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर अशा घटना टाळण्यासाठी किंबहुना अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी या भागात ८ कोटींचा निधी खर्च करुन संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसापासून आमच्या विभागाकडून डोंगराच्या तीव्र उतारावरील अतिक्रमणांचा सव्र्हे सुरु होता. त्यानंतर त्याचा अहवाल तयार झाला असून याठिकाणची १२०० अतिक्रमण आता हटविली जाणार आहे. त्यानंतर येथे संरक्षक भिंत उभारली जाणार आहे.
(नरेंद्र मुठे - वनक्षेत्र अधिकारी, ठाणे)

Web Title: Forest department to bulldoze over 1,200 houses on steep slopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे