पोलिसांपाठोपाठ आता उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:06 PM2021-07-21T21:06:24+5:302021-07-21T21:11:44+5:30

डान्सबार प्रकरणात आता पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम निरीक्षकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Following the police, four persons, including two officers of the Excise Department, have been suspended | पोलिसांपाठोपाठ आता उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांवर निलंबनाची कारवाई

उत्पादन शुल्कच्या आयुक्तांचे आदेश

Next
ठळक मुद्देउत्पादन शुल्कच्या आयुक्तांचे आदेशभाजपनेही केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डान्सबार प्रकरणात आता पोलिसांपाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम निरीक्षकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई मंगळवारी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज या तीन्ही बारमध्ये कोरोनाचे सर्व नियम धुडकावून बारबाला नृत्य करीत असल्याचे प्रकरण समोर आले होते. याचीच दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी वर्तकनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित केले. तर दोन सहायक पोलीस आयुक्तांची मुख्यालयात बदली केली. या कारवाई पाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांवरही कारवाईची मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी ठाण्यातील उत्पादन शुल्कच्या ए विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाºया आम्रपाली (एफएल-३) अँटीक पॅलेस या बारवरील कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बिट एकचे दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान सुरेंद्र म्हस्के तसेच अँटीक पॅलेस या बारच्या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत बिट दोनचे दुय्यम निरीक्षक प्रदीप सर्जने आणि जवान ज्योतिबा पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कोविड नियमांच्या पालनाची अंमलबजावणीमध्ये पालन न करणे आणि कारवाईच्या जबाबदारीमध्ये अक्षम्य हेळसांड केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
* निलंबनाबरोबर बदलीचीही कारवाई-
या चौघांच्या निलंबनाबरोबर त्यांची अन्य जिल्यांमध्ये उचलबांगडीही केली आहे. निलंबनाच्या कालावधीमध्ये दुय्यम निरीक्षक बजरंग पाटील आणि जवान म्हस्के यांना रायगड जिल्हयाच्या अधीक्षक कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. तर दुय्यम निरीक्षक प्रदीपकुमार सरजिने आणि जवान पाटील यांनी निलंबन कालावधीमध्ये पालघर अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
* नटराजवरील कारवाईमुळे बी विभागाला अभय-
रात्री उशिरापर्यंत नटराज बार चालू ठेवल्यामुळे बी विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील यांनी या बारवर कारवाई केली होती. त्यामुळेच निलंबनाच्या कारवाईतून बी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना अभय मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Following the police, four persons, including two officers of the Excise Department, have been suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.