भिवंडीत गोदामच्या छतावरील भंगाराला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 09:06 PM2021-12-08T21:06:17+5:302021-12-08T21:06:32+5:30

दोन मजली इमारतीच्या छतावर कापडी चिंध्या ,पुठ्ठा , प्लास्टिक ची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती.

fire broke out on the roof of a warehouse in Bhiwandi | भिवंडीत गोदामच्या छतावरील भंगाराला भीषण आग

भिवंडीत गोदामच्या छतावरील भंगाराला भीषण आग

Next

भिवंडी:  राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजुरफाटा येथील मुनीसुरत कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील इमारतीच्या छतावर साठविलेल्या भंगाराला बुधवारी अचानक आग लागण्याची घटना घडली.

दोन मजली इमारतीच्या छतावर कापडी चिंध्या ,पुठ्ठा , प्लास्टिक ची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. त्याला आग लागल्याने परिसरात  सुरवातीला एकाच घबराट उडाली होती, त्यामुळे इमारती मधील सर्व कामगारांनी इमारती बाहेर पळ काढला. दरम्यान घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल होत स्थानिक पाणी टँकर च्या मदतीने ही आग तब्बल दोन तासांनी आटोक्यात आणली . या दुर्घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगीचे कारण समजूशकले नाही , या दुर्घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

Web Title: fire broke out on the roof of a warehouse in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.