ट्रक-मोटारसायकल अपघातात पित्याचा मृत्यू: मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:47+5:302021-07-26T04:36:47+5:30

ठाणे : मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने मोटारसायकलीवरून जाणाऱ्या पिता-पुत्राला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर ...

Father killed in truck-motorcycle accident: Son seriously injured | ट्रक-मोटारसायकल अपघातात पित्याचा मृत्यू: मुलगा गंभीर जखमी

ट्रक-मोटारसायकल अपघातात पित्याचा मृत्यू: मुलगा गंभीर जखमी

Next

ठाणे : मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने मोटारसायकलीवरून जाणाऱ्या पिता-पुत्राला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, गायमुख येथे घडली. यात तुकाराम देवाजी सुमभे (७२) या पित्याचा जागीच मृत्यू झाला असून, मुलगा मंगेश (४४) गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बोरीवलीतील गोराई सोसायटीतील रहिवासी असलेले हे पितापुत्र ठाण्याकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला नागलाबंदर पोलीस चौकी, गायमुख येथे ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. मंगेश यांचा हात, पाय, डोक्याला तसेच पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Father killed in truck-motorcycle accident: Son seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.