आदर्श गांव संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील १७५१ शेतकऱ्यांना ‘शेत जमिनीची आरोग्य पत्रिका’

By सुरेश लोखंडे | Published: October 12, 2019 08:25 PM2019-10-12T20:25:38+5:302019-10-12T20:31:35+5:30

मृदा आरोग्य पत्रिका तयार करणारा हा प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यापूर्वी तो प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निश्चित झाले. यासाठी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांमधील केवळ पाच गावे निवडण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड  झाली. या पाच तालुक्यांच्या पाच गावातील खातेदार असलेले एक हजार ७५१ शेतकऱ्यांंच्या शेत जमिनीची ‘मृदा आरोग्य पत्रिका’ तयार केली आहे.

 'Farm land health magazine' to 1751 farmers from Thane district | आदर्श गांव संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील १७५१ शेतकऱ्यांना ‘शेत जमिनीची आरोग्य पत्रिका’

शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली शेत जमीन आरोग्य पत्रिका एक हजार ७५१ शेतकऱ्यांंना कृषी खात्याने शुक्रवारी घेतलेल्या शेतकरी मेळाव्या वाटप

Next
ठळक मुद्दे एक हजार ७५१ जमिनीचा आरोग्य पत्रिका तयार करून वाटप करण्यात आली.या आधी २०१५ व १६ या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील एक लाख १४ हजार शेतकऱ्यांंनाकल्याण,भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील एका गावाची निवड

सुरेश लोखंडे
ठाणे : राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांंच्या शेत जमिनीची ‘मृदा आरोग्य पत्रिका ’ तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प कृषी खात्याने ठाणे जिल्ह्यात हाती घेतला आहे. यासाठी पाच तालुक्यांमधील प्रत्येकी एका गावाची निवडून या प्रकल्पासाठी करण्यात आला. शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली शेत जमीन आरोग्य पत्रिका एक हजार ७५१ शेतकऱ्यांंना कृषी खात्याने शुक्रवारी घेतलेल्या शेतकरी मेळाव्या वाटप केली.
       आदर्श गाव संकल्पनेतून शाश्वत कृषी हा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यात आला आहे. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताचा वापर करून भात पिक प्रात्यक्षिक करून शुक्रवारी कल्याण तालुक्यातील घोटसई येथील शेतकरी मेळाव्यात एक हजार ७५१ शेतकऱ्यांंना त्यांच्या शेतीची शेत जमीन आरोग्य पत्रिका वाटप केल्याचे सुतोवाच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकूश माने यांनी लोकमतला सांगितले. कल्याण,भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील एका गावाची निवड करून तेथील शेतकऱ्यांंच्या शेकडो एकर शेत जमीनीची आरोग्य पत्रिका तयार करून वाटप करण्यात आले आहे. यावेळी कल्याण तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे, जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळेच्या तृप्ती वाघमोडे, कृषी पर्यवेक्षक भुतावळे, कृषी सहाय्यक निलम पाटील, टिटवाळा कृषी सहाय्यक वैशाली भापसे आदी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांंसह संबंधीत शेतकरी व महिला या शेतकरी मेळाव्यास उपस्थित हात्या.
     ‘जमीन आरोग्य पत्रिका’ या पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत ठाणे जिल्ह्यातून पाच तालुक्यातील पाच गावांची निवड केली असता तेथील शेत जमिनीचे जिल्हा मृद सर्वेक्षण व ठाणे येथील मृद चाचणी प्रयोग शाळा येथे या एक हजार ७५१ जमिनीचा आरोग्य पत्रिका तयार करून वाटप करण्यात आली. यामध्ये कल्याण तालुक्यामधील घोटसई येथील शेतकऱ्यांंच्या ४१७ जमीन आरोग्य पत्रिकांसह भिवंडी पिसे येथील ३३३, शहापूरमधील लेनाड बु येथील ३३०, मुरबाडमधील इंदे ३८१ आणि अंबरनाथ तालुक्यातील २९० शेतकऱ्यांंना या शेत जमिनीची आरोग्य पत्रिकांचे वाटप करून त्यांच्या शेत जमिनीमधील भात पिकांचे प्रात्येक्षिक करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांंनी या शेतकऱ्यांंना शेत जमिनीची निगा राखण्यासाठी व भरघोस शाश्वत पिक घेण्याच्या दृष्टी खत, बियाणे वापरण्याचे सखोल मार्गदर्शन ही यावेळी करण्यात आले.
         शेत जमिनीत अधिकाधिक उत्पन्न घेता यावे, यासाठी कृषी विभागासह कृषी तज्ज्ञांव्दारे विविध उपाययोजना व शास्त्रोक्त पध्दती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यास अनुसरून शेत जमिनीत योग्य पीक लागवड व पीकासाठी योग्य खत आदींची जाणीव करून देण्यासाठी आता शेत जमिनीचे शास्त्रोक्त परीक्षण कृषी तज्ज्ञाव्दारे केले आहे. जिल्ह्यातील ठिकठिकाच्या बदलत्या हवामानास अनुसरून शेत जमिनीचा अभ्यास केला जात आहे. याशिवाय जमिनीचा प्रकार व त्यात कोणते पीक घेणे शक्य आहे. त्या पिकास कोणत्या खताची व कोणत्या कालावधीत गरज आहे. खरीप पिकास व रब्बीच्या पिकाच्या उत्पादनासाठी जमिनीचा कस कसा आहे आदी सिध्द करणारी ही ‘मृदा आरोग्य पत्रिका’ शास्त्रोक्त व अभ्यासपूर्ण तयार करून शेतकऱ्यांंना सुपूर्द करण्यात आली आहे.
         मृदा आरोग्य पत्रिका तयार करणारा हा प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यापूर्वी तो प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निश्चित झाले. यासाठी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांमधील केवळ पाच गावे निवडण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड  झाली. या पाच तालुक्यांच्या पाच गावातील खातेदार असलेले एक हजार ७५१ शेतकऱ्यांंच्या शेत जमिनीची ‘मृदा आरोग्य पत्रिका’ तयार केली आहे. या मृदा पत्रिकेच्या माध्यमातून मिळालेल्या अनुभवावर आता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांंच्या शेत जमिनीची मृदा आरोग्य पत्रिका’ खास अभ्यासपूर्ण पध्दतीने तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात या आधी २०१५ व १६ या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील एक लाख १४ हजार शेतकऱ्यांंना आधीच त्यांच्या शेत जमिनीची मृदा आरोग्य पत्रिका देखील वाटप केली आहे.

Web Title:  'Farm land health magazine' to 1751 farmers from Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.