जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:46+5:302021-05-17T04:38:46+5:30

कल्याण : एकीकडे तौत्के चक्रीवादळ जिल्ह्यावर घोंगावत असताना शनिवारी रात्री उशिरा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडून कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी झाडे ...

Falling trees due to strong winds | जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड

जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड

Next

कल्याण : एकीकडे तौत्के चक्रीवादळ जिल्ह्यावर घोंगावत असताना शनिवारी रात्री उशिरा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडून कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी झाडे कोसळली. कल्याण पश्चिमेत जोशी बागेत झाड कोसळल्याने एका घराचे नुकसान झाले. त्याच ठिकाणी ट्रान्सफार्मरला आग लागल्याची घटनाही घडली. चिकणघर परिसरातही एका सोसायटीच्या आवारात झाड कोसळून पार्किंग व शेडचे नुकसान झाले. बारावे रोड खडकपाडा परिसरात सिद्धार्थ राज बंगल्याच्या आवारातील झाड कोसळून लोखंडी गेटचे नुकसान झाले. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरही झाड कोसळले. डोंबिवली पूर्वेकडील काटई, ठाकुर्ली सारस्वत कॉलनी, दावडी याठिकाणीही झाडांची पडझड झाली. कोपररोड परिसरात झाड कोसळल्याने तेथील रस्ता बंद झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पडलेले झाड बाजूला करून रस्ता सुरू केला.

---

फोटो आहे

Web Title: Falling trees due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.