अखेर पोलीस व्हॅनच झाली रुग्णवाहिका, तरीही महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 07:56 PM2020-09-07T19:56:19+5:302020-09-07T19:56:51+5:30

प्रशासनाचा हलगर्जीपणाची महिला ठरली बळी, शिवसेना नगरसेवकाचा आरोप

Eventually the ambulance became the police van, still the woman died in kalyan | अखेर पोलीस व्हॅनच झाली रुग्णवाहिका, तरीही महिलेचा मृत्यू

अखेर पोलीस व्हॅनच झाली रुग्णवाहिका, तरीही महिलेचा मृत्यू

Next

ठाणे - कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेचा अपघात झाला. एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या महिलेला पोलिस व्हॅनमध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला. महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर तिचा मृत्यू झाला नसता.  ती महिला प्रशासनाच्या हलगर्जीपणाची बळी ठरली आहे. कल्याण पूर्वेतील पुना लिंकरोडवर एका भरधाव दुचाकी चालकाने या महिलेस धडक दिली. या महिलेच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही महिला जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडली होती. ही घटना आज सायंकाळी साडे वाजताच्या सुमारास घडली. 

स्थानिक नागरीकांसह शिवसेना नगरसेवक गायकवाड यांनी हा प्रकार घडताच महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्याकरीता संपर्क साधला. रुग्णवाहिका तब्बल एक तासभर आलीच नाही.  याच रस्त्याने  एक पोलिस व्हॅन येताना दिसली. सर्वानी पोलिसाना विनंती केली. महिलेचे प्राण वाचविण्यासाठी तिला रुग्णालयात घेऊन चला. हा प्रकार पाहून पोलिसांनी व्हॅनमध्ये महिलेला नागरीकांच्या मदतीने उचलून व्हॅनमध्ये ठेवले. तिला  तिला उपचारासाठी उल्हासनगरातील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र तिला रुग्णालयात नेण्यास उशिर झाल्याने तिचा मृत्यू झाला. मृत महिला नक्की कुठे राहते? ती कोण आहे ? याची काही एक महिती समोर आलेली नाही. पोलिसांचा शोध सुरु आहे. यासगळ्य़ा घटनेचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

महापालिकेकडे सहा रुग्णवाहिका होत्या. रुग्ण संख्या वाढली तेव्हा महापालिकेने जवळपास ७४ रुग्णवाहिका भाडय़ाने घेतल्या होत्या. महापालिकेकडे स्वत:च्या आणि भाडय़ाने घेतलेल्या अशा एकूण ८० रुग्णवाहिका आहेत. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने महापालिकेस ९ रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे महापालिकेकडे एकूण ८९ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी एकही रुग्णवाहिका नगरसेवकांच्या संपर्कापश्चात लवकर उपलब्ध होऊ शकली नाही. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Eventually the ambulance became the police van, still the woman died in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.