बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 07:06 PM2020-06-14T19:06:53+5:302020-06-14T19:07:13+5:30

उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही इंजिनिअर. खासगी कंपनीत काम करणारे . या दोघांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरलं.

Engineer couple marriage at Anathashram in Badlapur; Helping social organizations avoid costs | बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

बदलापुरात इंजिनिअर जोडप्याने अनाथाश्रमात बांधली लग्नगाठ; खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

Next

बदलापूर : लग्न म्हटलं की थाटामाटात होणारा समारंभ.. हौसमौज.. मोठा खर्च.. जेवणावळी.. पण या सगळ्याला फाटा देत बदलापूरच्या एका जोडप्यानं अनाथाश्रमात आपली लग्नगाठ बांधली. आणि कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना दिला. 

उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही इंजिनिअर. खासगी कंपनीत काम करणारे . या दोघांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरलं. पण लॉकडाऊनमुळे ते मे महिन्यात ढकललं गेले. मे महिन्यातही लॉकडाऊन असल्यानं हे लग्न १४ जून रोजी करण्याचे ठरले. स्वप्नील आणि प्राची हे एकुलते एक. त्यामुळे लग्न धुमधडाक्यात होणार हे ठरलेले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमतानं हे लग्न एखाद्या अनाथाश्रमात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाजपचे नेते संभाजी शिंदे यांनी बदलापूरच्या सत्कर्म बालकाश्रमात लग्नाची व्यवस्था केली. यामागचा मूळ विचार होता तो म्हणजे लग्नाचा खर्च वाचवून त्यातून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत वऱ्हाडी मंडळींना फेसशिल्ड, मास्क देण्यात आले. आणि अतिशय छोटेखानी पद्धतीने हा लग्नसोहळा आज सत्कर्म बालकाश्रमात पार पडला. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेतून हा निर्णय घेतल्याचं दोन्ही कुटुंबीयांनी सांगितलं. तर नववधू आणि वरानेही यापुढे सर्वांनी आमचे अनुकरण करण्याचा संदेश दिला.

Web Title: Engineer couple marriage at Anathashram in Badlapur; Helping social organizations avoid costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.