निवडणुकीमुळे बंगाली बाबांचे भाव वधारले; नेते लोटांगण घालू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:06 PM2019-09-16T15:06:47+5:302019-09-16T15:09:00+5:30

निवडणुकीसाठी राजकीय नेते बंगाली बाबांच्या चरणी 

In election period increase rate of bangali baba; politician running to them | निवडणुकीमुळे बंगाली बाबांचे भाव वधारले; नेते लोटांगण घालू लागले

निवडणुकीमुळे बंगाली बाबांचे भाव वधारले; नेते लोटांगण घालू लागले

googlenewsNext
ठळक मुद्देबाबाच्या भेटीसाठी गेलेल्या नेत्यांची कुठेही वाच्छता होऊ नये, नाहक बदानामी होऊ नये, यासाठी बाबाच्या भेटीसाठी जाताना कार्यकर्त्याना याचा मागसूमही लागू दिला जात नाही. ठेवायला दिलेल्या आणि जाळण्यासाठी दिलेल्या ताविजमध्ये सांकेतिक भाषेचा अर्थ काय असतो.

कुमार बडदे
मुंब्रा -  बहुतांशी राजकीय नेते निवडणुकीचे पक्षाचे तिकिट मिळावे आणि निवडून यावे. त्याचप्रमाणे वरिष्ठ नेत्याची त्यांच्यावर कायम मर्जी रहावी आणि त्यांची राजकीय तसेच इतर कामे विनायास व्हावीत यासाठी बंगाली तसेच इतर प्रकारच्या तांत्रिक बाबाच्या शरणात जाऊन त्यांच्याकडून तोडगा करुन घेत असल्याचा ठाम दावा कथित तांत्रिक विद्या आत्मसात केलेल्या एका महिलेने लोकमतशी बोलताना केला.

काळी जादूच्या माध्यमातून ऐच्छिक कामे काही दिवस ते तासांमध्ये करुन देण्याच्या बाबागिरीच्या जाहिराती लावणाऱ्यांवर काही रेल्वेने उगारलेल्या कायदेशीर बडग्यामुळे रेल्वे लोकलच्या डब्ब्यामधून अशा जाहिराती लावण्यावर तांत्रिक बाबा तसेच त्यांच्या अनुयायांनी ब्रेक लावल्यामुळे सध्या अशा जाहिराती रेल्वे डब्ब्यामधून  हद्दपार झाल्या असल्या तरी शहरांमधील गल्लीबोळांमध्ये मात्र आजही अशा जाहिराती मोठ्या प्रमाणावर  दिसतात. माऊथ पब्लिसिटीद्वारेही बाबागिरी करणाऱ्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते. एखाद्याने एखाद्या कामासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी केलेल्या अथक प्रयत्नानंतरही त्याला यश आले नाही. तर तो शेवटच्या टप्प्यात बाबाकडे जातो. त्याने अगोदर केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला यश मिळते. परंतु शेवटच्या टप्प्यात बाबागिरी करणाऱ्याकडे गेल्यामुळे यश मिळाल्याचा त्याचा समज होते. हीच बाब तो त्याच्या मित्र परीवार, आप्तस्वकियांना सांगतो. अशा माऊथ पब्लिसिटीमुळे बाबागिरी करणाऱ्यांचा प्रचार आपोआप होते. अशा बाबांकडे जाणाऱ्या एखाद्याचेच त्याने केलेल्या मेहनतीमुळे त्याचे काम होते. ज्याचे काम होत नाही अशांना बाबा तुम्ही सांगितलेले पथ्यपाणी पाळले नाही. यामुळे तुमचे काम झाले नाही अशी लंगडी सबब पुढे करतो. ऐच्छिक प्राप्तीसाठी बाबाच्या  सांगण्याप्रमाणे वागून काहींनी अक्षरशः  घरदार विकल्याच्या तसेच नरबळीच्या नावाखाली निष्पाप जीवांची हत्या केल्याच्या घटना वेळोवेळी उघडकीस आल्या आहेत.याला आळा बसावा यासाठी राज्या शासनाने  अंधश्रद्धा विरोधी निर्मुलन कायदा संमत केला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये भाग घेऊन कायद्याच्या बाजूने मतदान उभे राहिलेले बहुतांशी राजकीय  नेते मात्र निवडणुकीमध्ये हमखास यश मिळावे (निवडून यावे) यासाठी बाबांना शरण जाऊन ते सांगतील त्याप्रमाणे प्रचारसभा, मतदारांच्या भेटीगाठीची व्यूव्हरचना आखतात. एवढेच नाही तर बाबा सांगतील त्याचवेळी उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करतात. बाबाच्या भेटीसाठी गेलेल्या नेत्यांची कुठेही वाच्छता होऊ नये, नाहक बदानामी होऊ नये, यासाठी बाबाच्या भेटीसाठी जाताना कार्यकर्त्याना याचा मागसूमही लागू दिला जात नाही. अशा भेटीगाठी एकांतामध्ये होतात. या भेटीदरम्यान नेत्यांच्या विश्वासामधला एखादाच त्यांच्याबरोबर असतो. या भेटी शक्यतो शहाराबाहेर होतात. या भेटीमध्ये  हमखास निवडून येण्यासाठी तसेच विरोधकांच्या कुरघोडीपासून वाचण्यासाठी तांत्रिक बाबा नेत्यांना घरामध्ये ठेवण्यासाठी काही वस्तू तसेच हातावर बांधण्यासाठी याचप्रमाणे पाकिटात ठेवण्यासाठी लाल तसेच काळ्या कपड्यात बांधलेले ताविज, गड्डे दोरे देतात. काही तांत्रिक लिंबूच्या माध्यमातून विरोधकाला संपविण्याची विद्या वापरतात, तर काही तांत्रिक मात्र कागदावर आडवे-तिडवे रकाने रेखातून त्यावर सांकेतिक भाषेत काहीतरी लिहून त्या कागदाची पुगळी करुन ते विरोधकाच्या नावाने जाळण्यास सांगतात. ठेवायला दिलेल्या आणि जाळण्यासाठी दिलेल्या ताविजमध्ये सांकेतिक भाषेचा अर्थ काय असतो. याची विचारपूस तांत्रिकांकडे जाणारा नेता  कधीच करत नाही आणि ते कळू नये यासाठी पुरेपुर खबरदारी घेतलेला तांत्रिकही ती देत नाही. परंतु सदर वस्तू जवळ ठेवल्यामुळे किंवा जाळल्यामुळे ऐच्छिक काम हमखास होणार या श्रध्देतून ती वस्तू किंवा ताविजला बाबाकडे जाणारे  नेते  जीवापाड जपतात असल्याची माहिती तांत्रिक बाबाकडे नियमित जाणाऱ्या एका राजकीय नेत्याने तसेच तांत्रिक विद्या आत्मसात केल्याचा दावा करणाऱ्या महिलेने  नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Web Title: In election period increase rate of bangali baba; politician running to them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.