मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी सभापतीपदाची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:17 AM2020-02-28T00:17:56+5:302020-02-28T00:18:26+5:30

भाजपमध्ये सभापतीपदावरुन एकमत नसल्याचे स्पष्ट

Election to be the permanent chairman of Mira-Bhayandar Municipality today | मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी सभापतीपदाची आज निवडणूक

मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थायी सभापतीपदाची आज निवडणूक

Next

मीरा रोड : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्या होणाºया स्थायी समिती सभापती पदासाठीच्या निवडणुकीत भाजपकडून वादग्रस्त अशोक तिवारी व दिनेश जैन या दोघांनी उमेदवारी अर्ज गुरूवारी दाखल केले. त्यामुळे भाजपमध्ये सभापतीपदावरुन एकमत नसल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे कमलेश भोईर यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज भरला आहे.

आमदार गीता जैन व माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सदस्य सुचवण्यावरून जुंपल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या. परंतु मेहतांनी बाजी मारत आपल्या समर्थकांची वर्णी लावून घेत जैन यांच्या वैशाली रकवी या एकाच नगरसेविकेला स्थान दिले. स्थायी समिती सभापती पदावरुन वाद नको म्हणून ही निवडणूक महापौर - उपमहापौर निवडणुकी होत आहे.

स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ४ तर काँग्रेसचे २ असे १६ सदस्य आहे. त्यातच सेनेच्या अनिता पाटील यांचा महापौर निवडणुकीपासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

तडीपारीचा प्रस्ताव असलेला उमेदवार
भाजपाने उमेदवारी दिलेले अशोक तिवारी हे भार्इंदर पोलीस ठाणे दप्तरी टॉप टेनमध्ये असून त्यांच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये भार्इंदर पोलिसांनी त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव प्रांतअधिकारी यांच्याकडे पाठवला असून त्यावर त्यांनी निर्णय घेतलेला नाही. लाच घेतानाही अटक केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता.

Web Title: Election to be the permanent chairman of Mira-Bhayandar Municipality today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.