Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:58 PM2022-08-19T16:58:43+5:302022-08-19T17:00:33+5:30

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आडनाव कपूर असले तरी श्रद्धा तर कोल्हापुरे, श्रद्धा कपूर यांनी मराठीत भाषण केलं

Eknath Shinde: As soon as the Chief Minister eknath Shinde spoke about the surname 'Kapoor', Shraddha told clearly me Marathi... | Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली

Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना?, अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. येथील दहीहंडी सोहळ्यात सेलिब्रिटी रंग पाहायला मिळाले. या स्टेजवर मुख्यमंत्र्यांसमेवत अभिनेत्री श्रद्धा कपूरही उपस्थित होती. त्यामुळे, श्रद्धाला पाहून मुख्यमंत्र्यांनी चांगलीच कोपरखळी मारली. तिचं आडनाव कपूर असलं तरी ती कोल्हापुरे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर श्रद्धानेही लगेचच मराठी बाणा दाखवून दिला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आडनाव कपूर असले तरी श्रद्धा तर कोल्हापुरे, श्रद्धा कपूर यांनी मराठीत भाषण केलं, त्यांची आई कोल्हापुरे आहे. त्यावर, 'मी तर मराठीच आहे' आहे असं उत्तर श्रद्धा कपूरने दिलं. त्यावेळी, उपस्थितांनीही श्रद्धाला दाद दिली. 

दहीहंडीवर यंदा निर्बंध नाहीत

मुख्यमंत्री शिंदेनी यंदाच्या दहीहंडी उत्सवावर कुठलेही निर्बंध नसल्याचं सांगत गोविंदासाठी सरकारने विशेष योजना आखल्याचं सांगितलं. गोविंदाना विमा पण दिला, सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही ५० थर लावून राजकीय हंडी फोडली

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: Eknath Shinde: As soon as the Chief Minister eknath Shinde spoke about the surname 'Kapoor', Shraddha told clearly me Marathi...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.