भिवंडीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा आठ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:03 AM2020-04-11T00:03:11+5:302020-04-11T00:08:56+5:30

ठाण्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने संयुक्तरित्या भिवंडीतील अवचितपाडा येथे केलेल्या कारवाईमध्ये आठ लाख २८ हजार ५५० रुपयांचा गुटखा गुरुवारी जप्त केला. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन त्याची तस्करी करणाºया मोहम्मद शेख याला या पथकाने अटक केली आहे.

Eight lakh stocks of Gutkha and tobacco products seized in Bhiwandi | भिवंडीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा आठ लाखांचा साठा जप्त

तस्करी करणाऱ्यास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देतस्करी करणाऱ्यास अटकभिवंडी गुन्हे शाखेची कारवाईअन्न व औषध प्रशासन विभागाचाही कारवाईमध्ये संयुक्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखरण्यासाठी राज्यभरात संचारबंदी असूनही प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करुन त्याची तस्करी करणाºया मोहम्मद इश्तीयाक शेख (३९, रा. भिवंडी, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून आठ लाख २८ हजार ५५० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भिवंडी शहरात लॉकडाऊनची स्थिती असतांनाही एक व्यक्ती प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या साठयाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लोहकरे आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण जोरी, जमादार सुभाष अहिरे, अब्दुल मन्सुरी आणि रविंद्र पाटील आदींच्या पथकाने भिवंडीतील अवचितपाडा येथे ९ एप्रिल रोजी छापा टाकला. याच छाप्यामध्ये मोहम्मद शेख याच्याकडे विविध नामांकित कंपन्यांचा विक्रीसाठी साठा केलेला आठ लाख २८ हजारांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. हा गुटखा पकडल्यानंतर मेसर्स नाझ एंटरप्रायझेसच्या नावाने नमराह रेसीडेन्सीमध्ये चालणारा गाळा क्रमांक दोन हा पोलिसांनी सील केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमने २०११ च्या कलमांनुसार तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Eight lakh stocks of Gutkha and tobacco products seized in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.