An eco-friendly detergent created by the students in Dombivli | डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट
डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट

- जान्हवी मोर्ये 

डोंबिवली : नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सरकारच्या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या बालविज्ञान परिषदेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेतील नंदन कार्ले व ओंकार ठाकूर यांनी इकोफ्रेंडली डिटर्जंट बनवले आहे. त्यांच्या या प्रकल्पाने पूर्व राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे.

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेकरिता ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना’ हा विषय प्रकल्प सादर करण्यासाठी दिला होता. त्यात पारंपारिक ज्ञानव्यवस्था हा उपविषय निवडून नंदन आणि ओंकार यांनी इकोफे्रं डली डिटर्जंट तयार केला आहे.

यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येते. इकोफें्रडली डिटर्जंट हा प्रकल्प आता पूर्व राज्यपातळीवर निवडला गेला आहे. राज्य पातळीवरील निवडीसाठी या प्रकल्पाची प्रथम फाइल पाठवण्यात येणार आहे. फाइलची निवड झाल्यास त्या प्रकल्पाला राज्यपातळीवर जाण्याची संधी मिळेल. राज्यपातळीची स्पर्धा पुण्यात ६ व ७ डिसेंबरदरम्यान होणार आहे. ही फाइल जिज्ञासा ट्रस्टमार्फत पुढे जाईल.

नंदन आणि ओंकार हे दोघे इयत्ता आठवीत आहेत. त्यांनी तयार केलेला हे डिटर्जंट केमिकलमुक्त असून हर्बल आहे. तसेच हा डिटर्जंट आॅल इन वन क्लिनर असणार आहे. हा डिटर्जंट कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आणि बेसिन धुण्याकरिता वापरता येऊ शकतो. सिथेंटिक डिटर्जंटने जलप्रदूषण होते. या समस्येवर हा डिटर्जंट एक चांगला पर्याय आहे. या प्रकल्पाच्या जागृतीसाठी नंदन यांनी एक पोवडा व पथनाट्य तयार केले आहे. स्वामी विवेकानंद शाळा आणि ट्युलिप सोसायटी यांनी नाटकाद्वारे या डिटर्जंटची जागृती केली आहे. या डिटर्जंटची सॅम्पल लोकांना वापरायला दिली आहेत. २३ नोव्हेंबरला पुसाळकर उद्यान येथे जागृती करण्यात येणार आहे. या डिटर्जंटने कपडे खराब होत नाही ना? कपड्यावरील डाग जातात का? कपडयाचा रंग नीट राहतो ना? या सगळ््याची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण विरहित हे डिटर्जंट आहे का हे पाहण्यासाठी पेंढरकर महाविद्यालयात ते टेस्टींगसाठी दिले आहे. त्याचा रिपोर्ट बुधवारपर्यंत मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या इकोफ्रें डली डिटर्जंटकडे वळण्याची गरज आहे असल्याचे नंदन यांनी सांगितले.

या डिटर्जंटमध्ये बाजारात सहज उपलब्ध होणाºया रिठा व शिकेकाई यासारख्या गोष्टींचा वापर केला आहे. या डिटर्जंटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यास ते कमी किंमतीत नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. या प्रकल्पाची टॅगलाईन ‘वापरा इकोफे्रं डली डिटर्जंट, जलप्रदूषण थांबवयाचे अर्जंट’ अशी आहे. एप्रिलपासून सतत वृत्तपत्रात उल्हासनदीच्या प्रदूषणाची बातमी येत होती. एका लेखामध्ये डिटर्जंटमध्ये केमिकल असल्याने त्यांचा खतासारखा वापर होतो. डिटर्जंटमधील केमिकल कमी केले पाहिजे, असे लिहिले होते. त्यावरून हे डिटर्जंट बनवण्याची कल्पना सुचल्याचे नंदन यांनी सांगितले. त्याचा हा प्रकल्पातील पहिलाच सहभाग आहे. या प्रकल्पासाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका जयश्री दौंड व मुख्याध्यापिका ज्योती नारखेडे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.

Web Title: An eco-friendly detergent created by the students in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.