ग्रहण आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही; चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 01:26 AM2020-11-29T01:26:54+5:302020-11-29T07:14:17+5:30

दा. कृ. सोमण: ३० नोव्हेंबरला दुपारी १ ते सायं. ५.२६ या वेळेत चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे.

Eclipse and corona have nothing to do; Lunar eclipse will not be visible from India | ग्रहण आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही; चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही 

ग्रहण आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही; चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही 

googlenewsNext

ठाणे : येत्या ३० नोव्हेंबर रोजी छायाकल्प चंद्रग्रहण आणि १४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ही ग्रहणे चीनला वाईट असून भारताला चांगली असल्याचे भाकीत काही लोकांनी वर्तविले आहे, त्यात काहीही तथ्य नाही. चंद्र-सूर्यग्रहणे ही खगोलीय नैसर्गिक घटना असते. त्यांचा मानवी जीवनावर व देशांवर काहीही परिणाम होत नसतो, हेही सोमण यांनी स्पष्ट केले.

याविषयी सोमण म्हणाले की, ३० नोव्हेंबरला दुपारी १ ते सायं. ५.२६ या वेळेत चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. परंतु, हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. ते उत्तर पूर्व यूरोप, अमेरिका, ओसेनिया, ॲास्ट्रेलिया आणि आशियाच्या काही भागांतून दिसणार आहे. तसेच १४ डिसेंबरला या वर्षातील अखेरचे खग्रास सूर्यग्रहण रात्री ७.०३ ते १२.२३ यावेळेत होणार आहे. तेही भारतातून दिसणार नसल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Eclipse and corona have nothing to do; Lunar eclipse will not be visible from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.