मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरडीसह माती, झाडे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:24 AM2020-08-05T11:24:01+5:302020-08-05T11:24:27+5:30

कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षा पासून दुर्लक्ष करीत असून महामार्ग वरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी वर उपाययोजना  करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत.

Due to torrential rains, soil, trees on roads in Kasara Ghat | मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरडीसह माती, झाडे रस्त्यावर

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरडीसह माती, झाडे रस्त्यावर

Next

- शाम धुमाळ 

कसारा :  मंगळवारी  रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग काही प्रमाणात विस्कळीत झाला तर कसारा घाटात काही ठिकाणी झाडेे, काही ठिकाणी दरडी सह मातीचे ढिगारे  रस्त्यावर कोसळले. परिणामी या मुळे मुंबईहुन नाशिककडे जाणारी वाहतूक तुरळक ठप्प झाली. 
  मुंबई ठाणेसह सर्वत्र पावसाचे प्रमाण जास्त असताना काल रात्री पासून शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रासह परिसरात मोठया प्रमाणात पावसाने जोर पकडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची शेती कामे जोरात सुरु झाली आहेत. मात्र, या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्ग विस्कळीत होत असल्याचे दिसून आले. मुंबईहुन नाशिककडे जाताना भिवंडी ते गोंदे (इगतपुरी )या दरम्यान महामार्गवर ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे व काही ठिकाणी पाणी  साचले असल्यामुळे मुंबई नाशिक व नाशिक मुंबई या दोन्ही लेन वर वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. तर कसारा घाटात ठीक ठिकाणी दरडी, माती, झाडें उन्मळून पडल्याने प्रवाशाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कसारा घाटातील दोन्ही लेन या धोकादायक स्तिथीत असल्यामुळे घाटातून प्रवास करणे प्रवाश्याना  जिकरिचे ठरत आहे.

पीक इन्फ्रा  व  NHI चे  दुर्लक्ष.... 
दरम्यान कसारा घाटासह महामार्गावरील दुरावस्थेकडे अनेक वर्षा पासून दुर्लक्ष करीत असून महामार्ग वरील रस्ते दुरुस्ती, कसारा घाटातील दरडी वर उपाययोजना  करण्यास दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी भरमसाठ टोल भरून देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकयावर टांगती तलवार ठेऊन प्रवास करावा लागत आहे. 

Web Title: Due to torrential rains, soil, trees on roads in Kasara Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस