DPR of Kalyan-Murbad Railway in four months - Kapil Patil | कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा डीपीआर चार महिन्यात - कपिल पाटील

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा डीपीआर चार महिन्यात - कपिल पाटील

बदलापूर : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) चार महिन्यांत तयार करण्यात येईल. तर आठ ते नऊ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरु वात होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईत खासदारांची बैठक झाली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आर. एस. खुराना, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न खासदार कपिल पाटील यांनी मांडले. त्याचबरोबर कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा प्रकल्प अहवाल प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले होते.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम रेल्वे प्रशासनाकडून प्राधान्याने घेण्यात आले. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. येत्या चार महिन्यांत अहवाल आल्यानंतर, त्याचा अभ्यास करून आठ ते नऊ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. त्यात भूसंपादनाच्या कामाचाही समावेश असेल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पनवेल-दिवा-भिवंडी रोड-वसई रोड रेल्वेमार्गावर फेºयांची संख्या वाढवावी, कल्याण-कसारा दरम्यान तिसºया व चौथ्या मार्गाच्या कामाला गती द्यावी, वासिंद येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला वेग द्यावा, आसनगाव रेल्वेस्थानकात कसाºयाच्या दिशेकडील पूल तयार करावा, खडवली ते वालकस-बेहरे दरम्यान नव्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अधिकाºयांबरोबर विशेष बैठक घ्यावी, आटगाव-तानशेत मार्गावरील कळमगाव येथे नवा भुयारी मार्ग वा रूंदीकरण करावे, टिटवाळा-खडवली दरम्यान गुरवली स्थानक, बदलापूर-वांगणी दरम्यान चामटोली स्थानकाला मंजुरी द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आटगावपर्यंत लोकलसंख्या वाढवावी, लोकलमध्ये दरवाजे अडविणाºया प्रवाशांविरोधात मोहीम राबवावी, चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम वेगाने करावे, भावनगर-काकीनाडा एक्स्प्रेसला भिवंडीत थांबा द्यावा, लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा द्यावा, डेक्कन क्वीन व इंटरिसटी एक्स्प्रेसला कल्याणमध्ये थांबा द्यावा आदी मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत वातानुकूलित लोकल सुरू करावी, अशी आग्रही मागणी खासदार पाटील यांनी केली. बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्र मांक दोनवर रेल्वे शेडचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे रोज शेकडो प्रवाशांची गैरसोय होत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. त्यावेळी अपूर्ण रेल्वे शेडचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले.

मुरबाड रेल्वेचे काम वेगाने होणार
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याचे जाहीर केले आहे. येत्या चार महिन्यांत अंतिम प्रकल्प अहवाल आल्यानंतर, नऊ महिन्यांत कामाला सुरु वात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: DPR of Kalyan-Murbad Railway in four months - Kapil Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.