Dombivali station complains of inconveniences | डोंबिवली स्थानकातील गैरसोयींची सुळेंकडून दखल
डोंबिवली स्थानकातील गैरसोयींची सुळेंकडून दखल

डोंबिवली : डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल बंद झाल्याने मधल्या पुलावर होणारी प्रवाशांची गर्दी जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे होणारी गैरसोय आणि संभाव्य अपघाताच्या मनसेने केलेल्या तक्रारीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत प्रवाशांच्या समस्या सुटाव्यात, असे टिष्ट्वट केले आहे.

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी बुधवारी रेल्वे प्रशासनाला मधल्या पादचारी पुलावरील जिन्यामध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ पाठवून काम लवकरात लवकर करा आणि प्रवाशांचे हाल थांबवा, असे म्हटले होेते. ते म्हणाले की, या स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल सहा महिन्यांपासून बंद आहे. सध्या जुन्या पूल पाडून तेथे नवीन पुलासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मे २०२० पर्यंत नवीन पुलाचे काम करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मात्र, पुलाच्या कामामुळे सध्या मधल्या पुलावर प्रचंड ताण पडत आहे. गर्दीच्या वेळी एखादा अपघात होऊ शकतो. ते टाळण्यासाठी लवकरात लवकर नवीन पादचारी पूल बांधावा व गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी लक्ष द्यावे, अशी तक्रार कदम यांनी रेल्वे मंत्रालय, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, विभागीय व्यवस्थापक, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे आदींकडे टिष्ट्वटरद्वारे केली होती.

त्यात पादचारी पुलावर होणाºया गर्दीचा व्हिडीओही होता. त्या टिष्ट्वटची रेल्वे प्रशासनाने तसेच सुळे यांनीदेखील दखल घेऊन डोंबिवलीकरांना होणाºया त्रासातून सुटका झाली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. लवकरात लवकर या प्रवाशांच्या अडचणीकडे लक्ष द्यावे, अन्यथा डोंबिवलीकरांच्या रोषाला सामोरे जाण्यास रेल्वेने तयार राहावे, असा इशाराही दिला होता.

Web Title: Dombivali station complains of inconveniences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.