महापालिकेतील डॉक्टर नॉट रिचेबल, भाजप, मनसे अन् रिपाइंचे नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:38 PM2021-04-13T17:38:47+5:302021-04-13T17:43:19+5:30

उल्हासनगर महापालिका आरोग्य सुविधा व्हेंटिलेटरवर

Doctor Not Reachable, all party leaders in the municipality were outraged in ulhasnagar | महापालिकेतील डॉक्टर नॉट रिचेबल, भाजप, मनसे अन् रिपाइंचे नेते संतापले

महापालिकेतील डॉक्टर नॉट रिचेबल, भाजप, मनसे अन् रिपाइंचे नेते संतापले

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या वर्षी कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यावर, महापालिकेने टाऊन हॉल मध्ये १५० बेडचे व्यवस्था केली. तसेच सर्व बेडला ऑक्सिजन पुरवठ्याची पाईप जोडण्या केल्या होत्या.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका वैधकीय डॉक्टरसह संबंधित डॉक्टर नॉट रिचेबल असून खाजगीसह महापालिका रुग्णालयाला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन रुग्णाच्या जीवितेला धोका निर्माण झाला. असा संतप्त आरोप उपमहापौर भगवान भालेराव यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी सोमवारी केला. त्यानंतर शहरात एकून किती ऑक्सीजनची मागणी आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली. 

उल्हासनगरात शेजारील शहराच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी असूनही आरोग्य सुविधा कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाली. असा आरोप उपमहापौर भगवान भालेराव, भाजपा शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आदींनी सोमवारी करून उपायुक्त अशोक नाईकवाडे व मदन सोंडे यांची भेट घेवून ऑक्सिजन तुटवड्या बाबत माहिती दिली. महापालिका वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांच्यासह अन्य डॉक्टर नॉट रिचेबल असून उपायुक्त अशोक नाईकवाडे व मदन सोंडे हे दोन अधिकारी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा सुरळीत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. महापालिका आरोग्य सुविधेबाबत नगरसेवक व नागरिकांना इतभूत माहिती मिळण्यासाठी एका समन्वयकाची नियुक्ती करण्याची मागणी केल्यावर, उपायुक्त नाईकवाडे यांनी एका समन्वयकाची नियुक्ती केली.

गेल्या वर्षी कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यावर, महापालिकेने टाऊन हॉल मध्ये १५० बेडचे व्यवस्था केली. तसेच सर्व बेडला ऑक्सिजन पुरवठ्याची पाईप जोडण्या केल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असतांनाही, रुग्णाची संख्या कमी झाली म्हणून ऑक्सिजन पुरवठ्याची पाईप लाईन काढण्यात आली. असा आरोप मनसेचे बंडू देशमुख यांनी केला. यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून पुन्हा ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लाखो रुपये खर्चून पाईप टाकण्याचे काम महापालिकेला करावे लागत आहे. महापालिका परवानगी विना ऑक्सिजन पाईप काढण्यावर कारवाई करा. अशी मागणी देशमुख यांनी लावून धरली आहे. कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजन पाईप काढण्यात आल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली. तर महापालिका प्रशासन व डॉक्टर, आरोग्य सुविधेबाबत समन्वय नसल्याने, आरोग्य विभागात सावळागोंधळ निर्माण झाल्याचा आरोप भाजपचे जमनुदास पुरस्वानी यांनी केला. 

आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना संसर्ग?

ऐन कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतांना आयुक्त डॉ राजा दयानिधी व अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दोन्ही अधिकारी होम कॉरंटाईन झाले असल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली असून अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: Doctor Not Reachable, all party leaders in the municipality were outraged in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.