आठ बोगस डॉक्टरांचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 01:44 AM2020-03-15T01:44:17+5:302020-03-15T01:44:40+5:30

कळवा पूर्व आणि पश्चिम भागात बेकायदेशीर दवाखाने चालवणा-या बोगस डॉक्टरांबाबत महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन प्रबंधक दिलीप डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारी २०२० रोजी कारवाई केली.

District court rejects bail of eight fake doctors | आठ बोगस डॉक्टरांचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला

आठ बोगस डॉक्टरांचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला

Next

ठाणे : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन संघटनेकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी नसताना बेकायदेशीररीत्या क्लिनिक थाटून गोरगरिबांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या कळव्यातील त्या ‘आठ’ बोगस डॉक्टरांचा जामीन अर्ज गुरुवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी फेटाळला. या प्रकरणात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला.

कळवा पूर्व आणि पश्चिम भागात बेकायदेशीर दवाखाने चालवणा-या बोगस डॉक्टरांबाबत महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन प्रबंधक दिलीप डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ फेब्रुवारी २०२० रोजी कारवाई केली.
या कारवाईत, अलोक सुभाषचंद्र सिंह-भास्करनगर, कळवा, रामजित कंचन गौतम वाघोबानगर, कळवा, गोपाळ बाबू विश्वास, मनीषानगर गेट नं १ कळवा, रामतेज मोहन प्रसाद, आझाद हिंद चाळ, वाघोबानगर, कळवा, सुभाषचंद्र राजाराम यादव, आनंदनगर, कळवा (पूर्व), जयप्रकाश बालजी विश्वकर्मा, कळवा, पौंडपाडा पोलीस चाळ, दीपक बाबू विश्वास, कळवा (प.) रेल्वे स्टेशनजवळ, रमाबाई आंबेडकर हौ.सो. कळवा, सत्यनारायण लालमन बीड, सद्गुरू चाळ, वाघोबानगर कळवा, अशा आठ बोगस डॉक्टरांना अटक केली. त्यांना ७ फेब्रुवारीला ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता
डॉक्टरांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यावर गुरु वारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष सरकारी वकील हिवराळे यांनी युक्तिवाद केल्यावर न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी युक्तिवाद आणि संभावीत धोके यासह विविध कारणास्तव जामीन अर्ज फेटाळताना त्यांनी त्या आठ जणांकडे अ‍ॅलोपॅथीक आणि आयुर्वेदिक औषधी साठा सापडला, महाराष्ट्र कौन्सिल नोंदणी नाही. डॉक्टरांकडे इन्स्टिट्यूट आॅफ अल्टर्नेटिव्ह मेडिसिन कोलकाता, पश्चिम बंगाल, याचे प्रमाणपत्र आणि नोंदणी असून महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन याची नोंदणी नाही. अशा प्रकरणात जामीन दिल्यानंतर पुन्हा हेच डॉक्टर विविध ठिकाणी पुन्हा क्लिनिक उघडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साक्ष नोंदवणाºया साक्षीदारांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवत तो जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: District court rejects bail of eight fake doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.