अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:09 PM2021-02-25T23:09:58+5:302021-02-25T23:10:04+5:30

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

Distribution of necessities to orphans | अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Next

पारोळ : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने साधेपणाने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. पण, या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने सामाजिक उपक्रम रद्द करून त्यांनी सायवन येथील वृद्धाश्रम, थळ्याचापाडा, अनाथाश्रम, जांभूळपाडा, सकवार या अनाथांसाठी असलेल्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यामुळे या संस्थाचालकांना मोठा दिलासा मिळाला. या प्रसंगी आमदार राजेश पाटील, माजी खा. बळीराम जाधव, माजी बांधकाम सभापती पांडुरंग पाटील, सायवन ग्रामपंचायत सरपंच गणेश जाधव, सायवन सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्याणी तरे, अशोक पाटील, अरुण पाटील, सदानंद पाटील  आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of necessities to orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे