जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:25 PM2021-02-22T18:25:29+5:302021-02-22T18:25:57+5:30

शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथे जिलानी इमारत दुर्घटना घडली होती . या दुर्घटनेत ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Distribution of checks of assistance fund as compensation to the families of Jilani building accident victims | जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप

जिलानी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप

googlenewsNext

नितिन पंडीत

शहरातील धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंड येथे जिलानी इमारत दुर्घटना घडली होती . या दुर्घटनेत ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नातेवाईकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी राज्य शासनातर्फे ३ लाख तर केंद्र शासनातर्फे २ लाख अशी एकूण ५ लाख रुपयांची नुकसान भरपाईच्या माध्यमातून सहाय्यता निधीच्या धनादेशाचे वाटप ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी उपस्थित होते. 

२१ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री अचानक जमीनदोस्त झालेल्या भिवंडीतील सय्यद जिलानी बिल्डिंग दुर्घटनेत एकूण ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर २१ नागरिक गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे लवकरात लवकर मदत मिळण्याबाबत राज्याच्या भूकंप व पुनर्वसन मंत्री यांचेकडे अनेक निवेदने सादर करून सततचा पाठपुरावा केल्याचे हे फलीत आहे असे मत आमदार रईस शेख यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडीतील जुन्या इमारती दुर्घटना व अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर योजना अंमलात आणण्याबाबत मार्गदर्शन केले. अगदी कमी वेळामध्ये सहाय्यता निधी मंजूर करून वाटप केल्याने आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पालकमंत्री एकनाथजी शिंदे, महाविकास आघाडीतील भूकंप व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले.

Web Title: Distribution of checks of assistance fund as compensation to the families of Jilani building accident victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.