मालमत्ता कागदपत्रांचे डिजिटलायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:28 AM2020-02-17T00:28:27+5:302020-02-17T00:28:47+5:30

नोंद प्रक्रिया सुरू : तब्बल ५७ लाख दस्तऐवज

Digitization of property documents | मालमत्ता कागदपत्रांचे डिजिटलायझेशन

मालमत्ता कागदपत्रांचे डिजिटलायझेशन

Next

सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील शेतीवाडीच्या मालमत्तेच्या मिळकतपत्रिकांसह भूमी अभिलेख व नगरभूमापन आदींकडील ब्रिटिशकालीन नकाशे जीर्ण होत आहेत. त्यांचे वेळीच जतन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महसूल विभागाकडील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या आॅनलाइन ई-फेरफारनोंदी, भूमी अभिलेख, नगरभूमापनकडील नकाशांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी तब्बल ५७ लाख नऊ हजार ४७१ महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कितीही वर्षांचे दस्तऐवज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

राष्टÑीय भूमी अभिलेख अद्ययावत या केंद्र शासनाच्या योजनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या महसूल विभागाच्या नियंत्रणातील शेतीच्या सातबाराच्या ई-फेरफारनोंद अद्ययावत केल्या जात आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या शेतवाडीशी संबंधित ४४ लाख २२ हजार ५८० कागदपत्रांचे, तर भूमी अभिलेख व नगरभूमापन कार्यालयाच्या १२ लाख ८६ हजार ८९१ हजार नकाशांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. त्यानंतर, लवकरच ई-फेरफार नोंंदी आणि मोठमोठे नकाशे संगणकीय डिजिटलायझेशनमुळे सहज उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, ते जीर्ण झाल्यामुळे त्यातील मजकूर कळत नसल्याच्या समस्येतूनदेखील कायमची सुटका होणार आहे.
जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाची तालुकापातळीवर सहा उपअधीक्षक कार्यालये कार्यरत आहेत. याशिवाय, नगरभूमापन अधिकाºयांची दोन कार्यालये असून, अशी एकूण आठ कार्यालये जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्या १३ प्रकारच्या मूळ अभिलेखांची संख्यात्मक माहिती सध्या तयार करण्यात आलेली आहे. त्यातील महत्त्वाचे सहा हजार ३०७ पुस्तके आहेत. दोन लाख २२ हजार चार शीट्स म्हणजे नकाशे प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची संख्या १३ लाख ३४ हजार ५७९ आहे. यासाठी या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचे काम जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळकतपत्रिकांचे अद्ययावतीकरण
महसूल विभागाच्या फेरफार प्रक्रिया आॅनलाइन करण्यात येणार आहे. ईपीसीआयएस संगणक प्रणालीमध्ये सुमारे एक लाख ८१ हजार ७४७ मिळकतपत्रिकांचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. या मिळकतपत्रिकांच्या डाटा एडिटिंगचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. सध्या या ईपीसीआयएस आज्ञावलीमधून मिळकतपत्रिकेची प्रिंटआउट काढून तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तपासणीच्या कामानंतर जिल्ह्यात आॅनलाइन फेरफार करण्यात येणार आहे.

Web Title: Digitization of property documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे