फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 03:05 PM2021-07-23T15:05:42+5:302021-07-23T15:08:43+5:30

Death of Father Stan Swamy :येथील कोर्टनाका परिसरात पार पडलेल्या या निदर्शनात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, इंटक, म्युज फाऊंडेशन, भारतीय महिला फेडरेशन, बहुजन असंघटीत मजदूर संघटना, एसआयपी , समता विचार प्रसारक संस्था, आर एमपीआय आदी संघटनांचे पदाधिकारी - कार्यकर्ते  या आंदोलनात सहभागी झाले, असे ए.पी.एम चे महाराष्ट्र समन्वयक जगदीश खैरालिया यांनी सांगितले. 

Demonstrations demanding stern action against the culprits in the death of Father Stan Swamy | फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने

फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने

Next
ठळक मुद्देसरकार विरोधातील आवाज दाबून अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवत असून केंद्र सरकार संविधान विरोधी भुमिका घेत असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले.

ठाणे : सामाजिक न्याय आणि आदिवासीं साठी आयुष्य वेचणारे फादर स्टेन स्वामी यांचे न्यायालयीन कस्टडीत असतांना निधन झाले होते. ८५ वर्षीय स्टेन स्वामी आजारी असताना  त्यांची गंभीर अवस्था होईपर्यंत त्यांना योग्य उपचार न दिल्यानेएका प्रकारे हा शासन पुरस्कृत खूनच आहे, असा आरोप करत येथील जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचा पुढाकाराने ठाण्यातील विविध समविचारी संस्था संघटनांतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी निदर्शने करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

येथील कोर्टनाका परिसरात पार पडलेल्या या निदर्शनात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, श्रमिक जनता संघ, इंटक, म्युज फाऊंडेशन, भारतीय महिला फेडरेशन, बहुजन असंघटीत मजदूर संघटना, एसआयपी , समता विचार प्रसारक संस्था, आर एमपीआय आदी संघटनांचे पदाधिकारी - कार्यकर्ते  या आंदोलनात सहभागी झाले, असे ए.पी.एम चे महाराष्ट्र समन्वयक जगदीश खैरालिया यांनी सांगितले. सामाजिक न्याय व दलित आदिवासींच्या बाजुने उभे राहणारे अनेक कार्यकर्त्ये राजद्रोहच्या खोट्या आरोपात जेलमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकार काही धर्मांध, दहशतवादी वर्तन करणारे काही विशिष्ट गटांना पाठीशी घालून सामाजिक परिवर्तन घडवू पाहणारे कार्यकर्त्यांना युएपीए कायद्याचा दुरोपयोग करत गजाआड करत असल्याचा आरोप यावेेळी आंदोलकांकडून करण्यात आला.

    

      

सरकार विरोधातील आवाज दाबून अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवत असून केंद्र सरकार संविधान विरोधी भुमिका घेत असल्याचे आरोपही यावेळी करण्यात आले. फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, यूएपीए आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले गेलेले निरपराध कार्यकर्ते यांच्या बाबतीत योग्य व तातडीच्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ताबडतोब जामीन मंजूर करण्यात यावे, यूएपीए सारखे सैतानी कायदे रद्द करावे, संविधान बचाओ - देश बचाओ अश्या मागण्यांचे निवेदन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, यांच्या मार्फत शुक्रवारी देण्यात आले. यावेळी भेटलेल्या  शिष्टमंडळात जगदीश खैरालिया, सचिन शिंदे, लक्ष्मी छाया पाटील,टी. ललिता, निर्मला पवार, सुब्रतो भट्टाचार्य, अजय भोसले, धोंडीराम खराटे,  सुनील दिवेकर,  उमाकांत पावसकर, लिलेश्वर बन्सोड, भास्कर गव्हाळे, ओंकार गरड आदी कार्यकर्ते होते.

Web Title: Demonstrations demanding stern action against the culprits in the death of Father Stan Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.