कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठीत करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:53 AM2019-11-25T00:53:18+5:302019-11-25T00:53:43+5:30

कोकण रेल्वेने संकेतस्थळावर (वेबसाईट) मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांना प्राधान्य देत, त्या भाषांमार्फत माहितीचा लेखाजोखा उपलब्ध केला आहे.

Demand for Konkan Railway Website in Marathi | कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठीत करण्याची मागणी

कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठीत करण्याची मागणी

Next

ठाणे : कोकण रेल्वेने संकेतस्थळावर (वेबसाईट) मराठी सोडून हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांना प्राधान्य देत, त्या भाषांमार्फत माहितीचा लेखाजोखा उपलब्ध केला आहे. तेव्हा कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठीत करावे, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालकाकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील खासदारांनीही याबाबत पाठपुरावा करण्याची अपेक्षा संघाकडून व्यक्त केली आहे.

जगात चौथ्या क्र मांकाचे रेल्वे नेटवर्कअसलेल्या भारतीय रेल्वेची आनुषंगिक रेल्वे कंपनी अर्थातच कोकण रेल्वे सेवेची सुरु वात २६ जानेवारी १९९८ रोजी झाली. कोकणचे खासदार दिवंगत मधू दंडवते यांच्या पाठपुराव्याने सुरु झालेल्या कोकण रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रातील नवीमुंबई येथे असून कोकण रेल्वेचा संपूर्ण कारभार महाराष्ट्रातून चालवण्यात येत आहे. कोकण रेल्वेसाठी कोकणवासियांच्या जमिनी उपयोजित झालेल्या असूनही कोकण रेल्वेचा लाभ कोकणवासियांपेक्षा परराज्यातील नागरिक अधिक प्रमाणात घेत आहेत, असे संघाचे सचिव दर्शन कासले यांनी केली आहे.

Web Title: Demand for Konkan Railway Website in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.