देखभाल दुरुस्ती कंत्राटाचा आज फैसला; परिवहन समितीच्या भूमिकेकडे लागले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:41 AM2019-12-13T01:41:00+5:302019-12-13T01:41:41+5:30

अपेक्षित उत्पन्न न वाढल्याचा ठपका

Decision on maintenance repair contract today; Attention was paid to the role of the Transport Committee | देखभाल दुरुस्ती कंत्राटाचा आज फैसला; परिवहन समितीच्या भूमिकेकडे लागले लक्ष

देखभाल दुरुस्ती कंत्राटाचा आज फैसला; परिवहन समितीच्या भूमिकेकडे लागले लक्ष

Next

कल्याण : वार्षिक देखभाल दुरुस्ती कंत्राटाचे (एएमसी) तीन कोटी रुपयांचे बील केडीएमटीकडून थकल्याने कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे त्याने कंत्राट बंद करण्यासंदर्भात केडीएमटीला आगाऊ नोटीस दिली आहे. मात्र, कंत्राट देऊनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही, असा ठपका उपक्रमाने ठेवला आहे. दरम्यान कंत्राट सुरू ठेवायचे की नाही? त्याचबरोबर कंत्राटदाराच्या थकीत बिलांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत उपक्रमाने प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत समिती कोणती भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.

केडीएमटीने जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या १०८ बस व पूर्वीच्या टाटा मेक २० मोठ्या बस, अशा एकूण १२८ बसच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मे. डिझेल कमर्शियल कॉर्पाेरेशन यांना दिले आहे. तीन वर्षांसाठी दिलेले हे कंत्राट १ मार्च २०१९ पासून सुरू झाले. यात वाहक स्वत:चे आणि चालक कंत्राटदारातर्फे उपलब्ध करून या बस मार्गावर चालविण्यास सुरुवात झाली होती. कंत्राटदाराला १२८ बसपैकी सुस्थितीतील ९५ बस दुरुस्तीसाठी उपक्रमाकडून दिल्या गेल्या होत्या. त्याचा लाभ प्रारंभी उपक्रमाला झाला. परंतु, त्यानंतर मात्र अपेक्षित उत्पन्न वाढले नाही, असे उपक्रमाचे म्हणणे आहे. बसच्या दुरुस्तीसाठी पुरेसा तांत्रिक कर्मचारी कंत्राटदाराकडून उपलब्ध नसणे, सुट्या भागांचा अभाव, बसचे ब्रेकडाउन होण्याचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे मार्गावरील फेऱ्या पूर्ण होत नसल्याने प्रवाशांमध्ये घट झाली आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर झाल्याकडे उपक्रमाने लक्ष वेधले आहे.

दरम्यान, कंत्राट सुरू होऊन सहा महिने उलटले असून, उपक्रमाने कंत्राटदाराची बिले अदा केलेली नाहीत. त्यात एएमसी अंतर्गत दुरुस्तीसाठी बºयाचशा बस उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत कंत्राट ३० नोव्हेंबरपासून बंद करण्याचे पत्र मे. डिझेल कमर्शियल कॉर्पाेरेशनने उपक्रमाला दिले आहे. यावर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंत्राट बंद न करता सुरू ठेवणेबाबत उपक्रमाने कंत्राटदाराला कळविले आहे. परंतु, कंत्राटदाराचे पत्र पाहता मध्यंतरी सभापती मनोज चौधरी यांनी गणेशघाट आगारात विशेष बैठक घेऊन यापुढे देखभाल दुरुस्ती उपक्रमातील कर्मचाऱ्यांकडून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंत्राट बंद झाल्यावर पुढचे नियोजन कसे करायचे यासंदर्भात चौधरी यांनी ही बैठक घेतली होती. त्यामुळे शुक्रवारी होणाºया समितीच्या सभेत सभापतींसह अन्य सदस्य एएमसी कंत्राटसंदर्भात कोणता निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाहतूक कोंडीही प्रवासी घटण्याला कारणीभूत

पत्रीपूल आणि दुर्गाडी पुलावर होणाºया वाहतूककोंडीमुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याचे उपक्रमाचे म्हणणे आहे. जादा उत्पन्न मिळवून देणारे मार्ग म्हणून पनवेल, वाशी, मलंगगड आणि भिवंडी, याकडे पाहिले जाते. परंतु, वाहतूककोंडीमुळे या मार्गावर बसच्या फेºया कमी झाल्या. दैनंदिन उत्पन्न एक लाखांपर्यंत तरी वाढले असते तर कंत्राटदाराची बिले देणे शक्य झाले असते पण तसे न झाल्याने कंत्राटदाराच्या बिलांची थकबाकी वाढत गेली. सध्या तीन कोटींच्या आसपास ही रक्कम पोहोचली असून कंत्राटदाराला काम करणे अशक्य झाले आहे.

Web Title: Decision on maintenance repair contract today; Attention was paid to the role of the Transport Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.