पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; आरोपीला अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:32 PM2021-11-25T12:32:22+5:302021-11-25T12:39:28+5:30

आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला.

daughter's Molestation by Father Accused arrested | पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; आरोपीला अटकेत

पोटच्या मुलीवर बापाने केला अत्याचार; आरोपीला अटकेत

Next

किन्हवली : शहापूर तालुक्यात अजनुप पंचक्रोशीतील मेंगाळपाड वस्तीत बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता उघड झाला. याबाबत आराेपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात आराेपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला तत्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

आराेपीला दाेन मुली असून काही वर्षांपासून ताे पत्नीच्या घरी भगतपाडा येथे राहात हाेता. पत्नीशी पटत नसल्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये ताे पत्नीपासून विभक्त झाला. त्यावेळी ताे १३ वर्षांच्या मुलीला साेबत घेऊन मेंगाळपाडा येथे राहायला आला, तर सहा वर्षांची मुलगी आपल्या आईसाेबत राहिली. त्याच्यासाेबत राहणाऱ्या मुलीला धमकावून ताे तिच्यावर सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत हाेता. या प्रकारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलीच्या पोटात असह्य वेदना होत असताना पोटातील गर्भ पडला. मृत गर्भाची आराेपीने विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराबाबत कुणकुण लागताच तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन बाेलते केले. तिने आराेपीच्या कृत्याचा पाढाच वाचला. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन आईने खर्डी पोलीस दूरक्षेत्र गाठून घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली. त्यावरून खर्डी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेशकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास केंद्रे तपास करीत आहेत.
 

Web Title: daughter's Molestation by Father Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.