ठाण्यातील राबोडी परिसरात सिलेंडरचा स्फोट; फ्लॅट बंद असल्याने मालमत्तेचीच हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 12:01 PM2020-11-27T12:01:41+5:302020-11-27T12:01:54+5:30

Cylinder explosion : सिलेंडरच्या गॅस चा भडका उडाल्याने हा स्फोट झाल्याचा  प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वर्तवण्यात आला आहे .

Cylinder explosion in Rabodi area of Thane; Property damage due to flat closure | ठाण्यातील राबोडी परिसरात सिलेंडरचा स्फोट; फ्लॅट बंद असल्याने मालमत्तेचीच हानी

ठाण्यातील राबोडी परिसरात सिलेंडरचा स्फोट; फ्लॅट बंद असल्याने मालमत्तेचीच हानी

googlenewsNext

ठाणे : आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास ठाण्यातील राबोडी परिसरातील  के व्हीला शाळेजवळ, करिश्मा सोसायटी  देवदीप सोसायटी मध्ये पहिल्या मजल्यावरील, रूम नं. १०४  मध्ये स्फोट झाला आहे. सिलेंडरच्या गॅस चा भडका उडाल्याने हा स्फोट झाल्याचा  प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वर्तवण्यात आला आहे .डेव्हिड सरोसे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून तो बंद होता .या स्फोटात जीवित हानी झालेली नाही .मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


 घटनास्थळी  अग्निशमन दलाचे 1 रेस्क्यू वाहन व 1 जीप, राबोडी पोलीस तसेच बॉम्ब शोध व नाशक पथकाने  धाव घेऊन तपासणी केली. या घटनेत  कोणालाही दुखापत झालेली नसून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सांगितले.

Web Title: Cylinder explosion in Rabodi area of Thane; Property damage due to flat closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.