The corporators of the BJP walked the walk | भाजपचे नगरसेवक चालले उटी फिरायला
भाजपचे नगरसेवक चालले उटी फिरायला

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील स्थायी समितीचे नगरसेवक युरोपला फिरायला जाणार असताना भाजपचे नगरसेवकही १ ते ५ जूनदरम्यान उटी येथे पर्यटनासाठी जाणार आहेत. या नगरसेवकांच्या सहलीचा खर्च पक्षाच्या वतीने केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याआधीही भाजप नगरसेवक पक्षाच्या खर्चाने कर्नाटकातील कुर्ग आणि महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते.


मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपचे ६१ नगरसेवक आहेत. त्यातच, शिवसेनेच्या अनिता पाटील, तर काँग्रेसचे नरेश पाटील व काँग्रेस समर्थक अमजद शेख यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनिता व नरेश यांना पक्षाकडून नोटिसा बजावताच त्यांनी पद रद्द होण्याची कार्यवाही टाळण्यासाठी आपण पक्षातच आहोत, अशी सारवासारव केली.


महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या करदात्या नागरिकांच्या पैशांमधून नगरसेवकांनी आतापर्यंत काश्मीर, सिमला, कुलू-मनाली, देहराडून, कुर्ग, उटी, दार्जिलिंग, सिक्कीम, गोवा, म्हैसूर, अंंदमान-निकोबार येथे अभ्यासदौºयाच्या नावाखाली आपली मौजमजा करून घेतली आहे. नागरिकांच्या पैशांमधून फुकटचे पर्यटन होत असल्याने बहुतांश नगरसेवक असे दौरे काढण्यासाठी नेहमीच पुढे असतात. आतापर्यंत काही कोटींचा खर्च या नगरसेवकांच्या मौजमजेसाठी झाला आहे.


एकीकडे विकासकामांना पैसे नाही म्हणून नागरिकांवर नवीन कर लादतानाच दरवाढही सत्ताधाऱ्यांनी केली आहे. पण, पालिकेच्या खर्चातून दौरे मात्र नगरसेवक आणि पालिका प्रशासन बंद करण्यास तयार नाहीत. सर्व नगरसेवकांचा महापालिकेच्या खर्चातून कुर्ग या पर्यटन ठिकाणी काढला जाणारा दौरा टीकेची झोड उठल्यावर रद्द करण्यात आला होता. पण, महिला बालकल्याण, वृक्ष प्राधिकरण समितीचे नगरसेवक मात्र अनुक्रमे दार्जिलिंग व देहराडूनला मौजमजा करून आले. महापालिकेच्या खर्चातून दौरा रद्द झाल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांसाठी कुर्गची सहल आयोजित केली होती. काही महिन्यांपूर्वीच भाजप नगरसेवकांची महाबळेश्वर येथेही सहल झाली.


आता १ जून रोजी भाजप नगरसेवक पर्यटनासाठी उटी येथे जाणार आहेत. पाच दिवसांचा हा दौरा असून यासाठी सुमारे २० ते २५ लाखांचा खर्च होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या ६१ नगरसेवकांपैकी माजी महापौर गीता जैन यांच्यासह काही नगरसेवक जाणार नसले, तरी शिवसेना व काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नगरसेवक मात्र या पर्यटनात भाजप नगरसेवकांसोबत सहभागी होतील, अशी शक्यता आहे.

भाजप नगरसेवकांच्या उटी दौºयाचा खर्च आणि नियोजन पक्षाच्या वतीने केले असून जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे हे जबाबदारी सांभाळत आहेत.
- हसमुख गेहलोत,
गटनेते, भाजप

भाजप नगरसेवकांचा उटी येथे जाणाºया दौºयाचा खर्च पक्ष करणार आहे. नगरसेवकांसोबत कुणी कुटुंबीय येत असल्यास त्याचा खर्च त्या नगरसेवकांनी करायचा असल्याचे आधीच सांगितले आहे. महापालिकेच्या पैशांतून दौरे न काढता स्वखर्चाने दौरे सुरू करून भाजपने पालिकेच्या निधीची बचतच केली आहे. एक चांगला पायंडा भाजप स्थानिक नेतृत्वाने घालून दिला आहे. - हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजप


Web Title: The corporators of the BJP walked the walk
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.