Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी ठामपाची तीन पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:45 AM2020-03-17T01:45:27+5:302020-03-17T01:46:08+5:30

अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली असून दिलेल्या वेळेत ती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत.

Coronavirus : TMC Make Three squads for Prevent Corona | Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी ठामपाची तीन पथके

Coronavirus : कोरोनाच्या सामन्यासाठी ठामपाची तीन पथके

Next

ठाणे  - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक केली असून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार केली असून दिलेल्या वेळेत ती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत.
यामध्ये अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत विनोद इंगळे (उपअभियंता विद्युत), महेश रावळ (उपअभियंता श.वि.वि.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत. उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत गुणवंत झांबरे (उपअभियंता यांत्रिकी), फारूख शेख (सहा. आयुक्त, मुख्या.), उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत दशरथ वाघमारे (समाजविकास अधि.), मकरंद काळे (विधी सल्लागार), तर उपायुक्त मनीष जोशी यांच्या समन्वयांतर्गत देवेंद्र नेर (प्र. कार्य. अभियंता), गजानन गोदापुरे (उप.कनि.व.सं.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त वर्षा दीक्षित यांच्या समन्वयांतर्गत विनोद पवार (कार्यकारी अभियंता पा.पु.), राम जाधव (उपअभियंता श.वि.वि.), मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनेष वाघिरकर यांच्या समन्वयांतर्गत सदाशिव माने (कार्यकारी अभियंता सा.बां), दिनेश तायडे (उपकरनिर्धारक ), सहायक संचालक श्रीकांत देशमुख) यांच्या समन्वयांतर्गत रामदास शिंदे (कार्यकारी अभियंता श.वि.वि.), राजेश कंकाळ (शिक्षण अधिकारी), तर उपायुक्त सचिन गिरी यांच्या समन्वयांतर्गत प्रदीप मकेश्वर (मुख्य लेखापाल), रवींद्र कासार (उपअभियंता श.वि.वि.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली दुसºया पथकात उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत सुनील पाटील (कार्यकारी अभियंता श.वि.वि.), दयानंद गुंडप (उपसमाजविकास अधि.), उपायुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत शैलेंद्र बेंडाळे (प्रभारी श.वि.विन.अ.), विकास ढोले (कार्यकारी अभियंता पा.पु.वि.), उपायुक्त मनीष जोशी यांच्या समन्वयांतर्गत नितीन येसुगडे (कार्यकारी अभियंता श.वि.वि), विजय रोकडे (उपअभियंता वि.वि.), तर उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत सुनील पाटील (कार्य. अभि. श.वि.वि), विलास ढोले (कार्यकारी अभियंता सा.बां) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.

Web Title: Coronavirus : TMC Make Three squads for Prevent Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.